पीक विम्याच्या लाभासाठी शेतकरी संघटना आक्रमक – सर्व मंडळातील शेतकºयांना सरसकट पीक विमा देण्याची मागणी

0 22

पीक विम्याच्या लाभासाठी शेतकरी संघटना आक्रमक
– सर्व मंडळातील शेतकºयांना सरसकट पीक विमा देण्याची मागणी

लातूर : जिल्ह्यातील साठही मंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांचे मोठ्या नुकसान झाले आहे. पीक विमा कंपनीने केवळ १० मंडळे पीक विम्यासाठी पात्र ठरवली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत कृषी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. सर्व मंडळातील शेतकºयांना सरसकट पीक विमा द्या अन्यथा चाबकांनी फोडून काढू असा इशारा या शेतकरी संघटनांनी प्रशासनाला दिला आहे.
यावर्षी कमी पाउस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर आर्थिक हातभार लागावा यासाठी लातूर जिल्हयातील जवळपास ८ लाख शेतकºयांनी पीक विमा भरला होता. त्यातच पावसाचे दगा दिल्याने शिवारातील पीके करपून गेली. यामुळे कृषी विभाग व पीक विम्याचा कंपन्यांनी पंचनामे केले. दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होईल, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले़
लातूर जिल्ह्यातील साठही मंडळाला सरसकट पीक विमा देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी पीक विमा कंपनीला दिल्या होत्या़ मात्र आता विमा कंपनीकडून केवळ १० मंडळे पात्र ठरविण्यात आली आहेत. १० मंडळे सोडता बाकी सोडता बाकी शेतकरी झाले असून शेतकरी संघटनेने कृषी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे़ जोपर्यंत साठही मंडळातील शेतकºयांना सरसकट पीक विमा मंजूर होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका या शेतकºयांनी घेतली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.