शीख पगडी म्हणजे दहशतवाद नाही : एरिक अ‍ॅडम्स – शीख धर्माबद्दल शिक्षित करणे आवश्यक

0 40

शीख पगडी म्हणजे दहशतवाद नाही : एरिक अ‍ॅडम्स
– शीख धर्माबद्दल शिक्षित करणे आवश्यक

न्यूयॉर्क : अमेरिकेत शीख समुदायावर हल्ले झाल्यामुळे न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स म्हणाले की, शीख पगडी म्हणजे दहशतवाद नाही. पगडी हे श्रद्धेचे प्रतिक आहे, त्याला दहशतवादाशी जोडणे खेदजनक आहे. शीखांविरुद्धच्या घटना आपल्या देशावर डाग लागल्यासारख्या आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या काही लोकांमध्ये गैरसमज आहे. आज आपण लोकांना शीख धर्माबद्दल शिक्षित करणे आवश्यक आहे.
दक्षिण रिचमंड हिलजवळील बाबा माखन शाह लुबाना शीख केंद्रात एका शीख कार्यक्रमात भाग घेतला. येथील शीख समुदायाला संबोधित करताना ते म्हणाले, तुमचा दहशतवादाशी संबंध नाही. तुम्हीच रक्षक आहात. हे संपूर्ण शहरात शिकवले पाहिजे. तुमचा धर्म काय आहे आणि तो कोणत्या प्रकारच्या गोष्टी शिकवतो हे आमच्या तरुणांना माहित असणे आवश्यक आहे. तुमची पगडी म्हणजे संरक्षण आणि सर्वांना एकत्र आणणे. आपण एकत्र येऊन हे जनतेला सांगावे आणि निर्माण झालेला गैरसमज बदलला पाहिजे.आपण मिळून हा गैरसमज बदलू. शहराच्या विकासात शीख समाजाचे महत्त्वाचे योगदान असून त्यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचे एरिक यांनी सांगितले.
१९ वर्षीय शीख तरुणावर हल्ला
१५ आॅक्टोबर रोजी न्यूयॉर्कमध्ये १९ वर्षीय शीख तरुणावर गुरुद्वारात जात असताना हल्ला झाला होता. मारहाण करताना त्यांची पगडी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शीख तरुणांच्या धर्मावर निशाणा साधत टिप्पणी करण्यात आली. यानंतर ६६ वर्षीय जसमेर सिंग यांच्या चेहºयावर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.