टिळकाचे समुद्र मंथन आणि योनी पुराण – नेटक-यांकडून खिल्ली

0 811

टिळकाचे समुद्र मंथन आणि योनी पुराण
– नेटक-याकडून खिल्ली

 

Bal Gangadhar Tilak बाळ गंगाधर टिळक यांच्या ‘लोकमान्य’ पदवीसंदर्भात लोकांमध्ये अनेक वर्षांपासून संभ्रम आहे. काही लोक यांना लोकमान्य म्हणतात तर काही भटमान्य म्हणून चर्चा करताना दिसतात. परंतू आता ‘घरचा आहेर’ या नावाने सोशल मिडीयावर एका पुस्तकाच्या संदर्भ देऊन एक संदेश सध्या खुप व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे नेटकरी बाळ गंगाधर टिळक यांच्या चारित्र्यावर हासताना दिसत आहेत. या पुस्तकात टिळकांनी समुद्र उल्लंघन केल्यानंतर तत्कालीन वर्णव्यवस्थेने त्यांना शिक्षा म्हणून स्त्री योनीतून पुनर्जन्म दिला आहे. यासाठी वापरली गेलेली स्त्री योनी सोन्याची असल्याचेही या पुस्तकात नमुद असल्याचा संदेश सध्या फिरताना दिसत आहे.

बाळ गंगाधर टिळक यांचे नातू मा. ज.श्री. टिकळ यांनी लिहिलेल्या ‘मी जयंत टिळक’ पद्मगंधा प्रकाशन, पुणे या पुस्तकात, बाळ गंगाधर टिळक हे विलायतेला समुद्रमार्गे गेल्यानंतर इथल्या वर्णव्यवस्थेचे कट्टर समर्थन करणा-या धर्मशास्त्रांचा आधार घेऊन इथल्या धर्मांध लोकांनी त्यांच्याशी केलेल्या व्यवहाराची मांडणी केली आहे. या पुस्तकात बाळ गंगाधर टिळक जेव्हा विलायतेला समुद्रमार्गे जाऊन आले, तेव्हा टिळकांनी समुद्र उल्लंघन करून धर्मद्रोह केला, अशी बोंब पुण्यातील ब्राम्हणांनी उठवली होती. त्यांनी प्रायाशित्त म्हणून टिळकांना गोमुत्र आणि शेण मिश्रित पंचद्रव्य प्राशन करायला लावले होते. तरीही पोथीनिष्ठ कर्मठ ब्राम्हणांचे समाधान झाले नव्हते. (त्यातून पुरेशी दक्षिणा न मिळाल्यामुळे.) मग धर्मग्रंथांचा हवाला देऊन त्यांनी सांगितले की, “समुद्र उल्लंघन हे पाप आहे, त्यासाठी देहांत प्रायाशित्त हीच शिक्षा आहे. मग टिळकांना या पापातून मुक्त करण्यासाठी आणि दान मिळण्यासाठी ब्राम्हणांनी टिळकांचा पुनर्जन्म घडून आणला. यासाठी टिळकांना भली मोठी सोन्याची स्त्री योनी बनवायला सांगितली, आणि त्या योनीतून टिळकांना विधिवत बाहेर काढले. नंतर ती सोन्याची स्त्री योनी ब्राम्हण पुरोहितांनी आप-आपसात वाटून घेतली.
अजब धर्मशास्त्र !
दक्षिणेसाठी केवढा हा आटापिटा ? असा उल्लेख या व्हायरल संदेशामध्ये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.