तीन दिवसापासुन एसआयटी चौकशी समितीची वाट बघतोय – समाजाने आक्षणासाठी पुन्हा एकजूटीने सज्ज व्हावे, मराठायोध्दा मनोज जरांगे आवाहन

0 41

तीन दिवसापासुन एसआयटी चौकशी समितीची वाट बघतोय
– समाजाने आक्षणासाठी पुन्हा एकजूटीने सज्ज व्हावे, मराठायोध्दा मनोज जरांगे आवाहन

परंडा : राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांची चौकशी करायची सोडून सरकारने माझी चौकशी लावली आहे, या चौकशी समितीची तीन दिवसापासुन वाट बघतोय परंतु, अद्याप कोणी आले नाही. मात्र मी मराठा समाजाला आरक्षण मिळवुन लेकराबाळांच्या डोक्यावर गुलाल लावल्या शिवाय एक इंच देखील मागे हटणार नाही, समाजाने आक्षणासाठी पुन्हा एकजूटीने सज्ज व्हावे, असे आवाहन मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी परंडा येथे रविवारी रोजी मराठा समाजाशी संवाद साधताना केले.
परंडा शहरात महाराणा प्रतापसिंह चौक येथे जरांगे पाटील यांनी समाजाशी संवाद साधला. दरम्यान पाटील यांचे सकल मराठा समाजच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करत श्री विठ्ठलाची मुर्ती भेट देण्यात आली. यावेळी विविध संघटना तसेच मुस्लीम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक रामभाऊ पवार यांच्या सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या आयसीयू विभागाचे मनोज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
परंडा येथील युवकांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हटले की, राज्यातील भ्रष्टाचारी पुढाºयांची चौकशी करायची सोडून माझी चौकशी लावली, मी चौकशीला घाबरणारा नाही, तीन दिवसांपासुन चौकशी समितीची वाट पाहिली व संवाद दौरा सुरू केला. १० टक्के आरक्षण आपल्या कामाचे नाही ते अर्धवट असून त्याचा लाभ राज्याच्या मर्यादित आहे. लेकरांच्या उच्च शिक्षणासाठी लाभदायक नाही व हे तुम्हा आम्हाला मान्य नसलेले आरक्षण सरकार लादण्याचा प्रयत्न करीत आहे. ते मी मान्य केलेले नाही. म्हणूनच माझ्यावर दबाव टाकत आहेत. त्यामुळेच एसआयटी चौकशी लावली गेली आहे. मी या चौकशीला घाबरनारा नाही. जेलमध्ये जायला तयार आहे. पण ओबीसीतूनच पुर्ण आरक्षण घेणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले, यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave A Reply

Your email address will not be published.