‘डिसीज एक्स’ घेणार ५ कोटी जनतेचा बळी ? – डब्ल्यूएचओसह अनेक तज्ज्ञांनी केली भिती व्यक्त

0 785

‘डिसीज एक्स’ घेणार ५ कोटी जनतेचा बळी ?

– डब्ल्यूएचओसह अनेक तज्ज्ञांनी केली भिती व्यक्त

 

लंडन : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीपेक्षा ७ पट अधिक धोकादायक महामारी येण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) अन्य विशेषज्ज्ञांनी दिला आहे. डब्ल्यूएचओ या संभाव्य महामारीला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे. या महामारीमुळे पाच कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोना महामारीपेक्षा पुढची महामारी सातपट अधिक गंभीर ठरू शकते, असा इशारा ब्रिटनच्या लस कृती दलाच्या अध्यक्ष डेम केट बिघम यांनी दिला आहे. डब्ल्यूएचओने या संभाव्य महामारीला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे. तसेच ही मृत्यू होण्याची भीती व्यक्त महामारी शक्यतो अगोदरच वाटेवर असण्याचा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे. आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कोरोना महामारीने जगभरात जवळपास ७ लाख जणांचा बळी घेतला आहे. पण संभाव्य महामारीमुळे जगभरात जवळपास पाच कोटींहून अधिक बळी जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. संभाव महामारी ही सध्या अस्तित्वात असलेल्या विषाणूमुळे पसरणार आहे. कारण विषाणूमध्ये वेगाने म्युटेशन होत आहे. म्युटेशन म्हणजे एखादा जीव बदलत्या परिस्थितीनुसार जिवंत राहण्यासाठी स्वतःमध्ये सातत्याने बदल करत असतो. या बदलामुळे काही काळाने विद्यमान विषाणूचा नवीन स्ट्रेन तयार होतो, तर संभाव्य महामारीचा धोका लक्षात घेत ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी अगोदरच त्याला रोखण्यासाठी विविध पातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

विषाणूंचा अभ्यास आणि लस निर्मिती

वैज्ञानिकांकडून अशा प्रकारच्या २५ विषाणूंवर अभ्यास केला जात आहे. तसेच या विषाणूंवर प्रभावी ठरू शकणाऱ्या लसच्या निर्मितीवरदेखील जवळपास २०० वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केले आहे. १९१८-१९ साली जगभरात पसरलेल्या फ्लूमुळे पाच कोटींहून अधिक लोक ठार झाले होते. संभाव्य महामारीदेखील इतकीच घातक ठरू शकते, असे बिघम म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.