चिंचांबापेन येथे संभाजी ब्रिगेड शाखेचे धुमधडाक्यात उद्घाटन

0 98

चिंचांबापेन येथे संभाजी ब्रिगेड शाखेचे धुमधडाक्यात उद्घाटन

 

रिसोड : तालुक्यातील चिंचांबापेन येथे संभाजी ब्रिगेड शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड गजाननभाऊ भोयर, कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवतराव देशमुख, प्रमुख उपस्थतीमध्ये जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गणेश सुर्वे, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गोपाल खडसे, विधानसभा अध्यक्ष रिसोड अर्जून पाटील खरात हे मान्यवर उपस्थित होते.
राज्यामध्ये राजकीय पक्ष्यांच्या नेतृत्वामधील फोडाफोडीच्या राजकारनामुळे राज्यभर कधीही न बघीतलेल्या घटना पहायला मिळत आहे. कोणत्याही राजकीय नेत्याला विचारधारा राहिलेली नाही. राजकीय पुढाऱ्यांच्या फक्त सत्ता आणि पैसा यासाठीच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे कोलांट्या उड्या मारणे सुरू आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नेते स्वतः चा स्वार्थ साधतांना दिसत आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार तरुण सर्वांच्या समस्या जैसे थे अश्या अवस्थेत आहेत. जनता संभ्रम अवस्थेमध्ये आहे. अशावेळी मात्र संभाजी ब्रिगेड गावागावात जाऊन शाखेची स्थापना करत आहे. जनतेमध्ये जनजागृती करत राजकीय मंडळीचे पितळ उघडे पाडत एक एक गाव संभाजी ब्रिगेड आपल्या ताब्यात घेत आहे. प्रत्येक गावातून शेकडो तरुण ब्रिगेडमध्ये सहभागी होतांना दिसत आहेत. शंभर टक्के समाजकारण आणि शंभर टक्के राजकारण ही भूमिका घेऊन जोमाने काम सुरू करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडची लोकप्रियता वाढत चालली असून प्रचंड मोठा जनसमुदाय सामील होत आहे. म्हणून येणाऱ्या आगामी निवडणुका जवळ आल्याने आता प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या समोर ब्रिगेड मुळे मोठे आव्हान उभे झाले आहे. अशा परिस्थितीमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडमुळे उलथापाल होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील चिंचांबापेन येथे संभाजी ब्रिगेड शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक व उद्घाटन विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड गजाननभाऊ भोयर, कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवतराव देशमुख, प्रमुख उपस्थतीमध्ये जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे विभागीय सचिव नितेश पोहकर, जिल्हासचिव शेख इसाक संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गोपाल खडसे,जिल्हा कार्याध्यक्ष गजानन खंदारे, विधानसभा अध्यक्ष रिसोड अर्जून पाटील खरात, जिल्हाप्रवक्ता विकास बापू देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे,जिल्हा सहसंघटक मुन्ना भवानीवाले, जिल्हा सदस्य संतोष भिसडे, राधेश्याम सिरसाठ, अमोल सरनाईक, धनंजय सरनाईक, विजय झुंजारे ,धीरज सरनाईक, गोपाल कोल्हे आदी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.