आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या : मनोज जरांगे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाकडे मनोज जरांगे यांची मागणी

0 37

आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या : मनोज जरांगे
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाकडे मनोज जरांगे यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा निर्णय २४ डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने शनिवार रोजी रुग्णालयात मनोज जरांगे यांची भेट घेत सांगितले़ यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने मागासवर्ग आयोगाच्या अहवालासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. या चर्चेदरम्यान कुणबी नोंदींबाबत समाधानी असून आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या असे मनोज जरांगे यांनी सांगितले. सरकारकडून आलेला प्रस्ताव वाचून अंतरवाली येथे रविवार दि़ १७ डिसेंबर रोजी होणाºया बैठकीत निर्णय येईल, असे जरांगे यांनी सांगितले़
अंतरवाली (ता. अंबड) येथे रविवार रोजी मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे़ मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आहे. या बैठकीपूर्वीच राज्य सरकारने सावध पवित्रा घेत आपले शिष्टमंडळ पाठवून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली़ यात पालकमंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या समावेश होता़ यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने सांगितले की, राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडणार नाही त्यांनाही मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर आरक्षणात समाविष्ट केले जाईल, असे महाजन म्हणाले.
राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याने समाजहितासाठी २४ डिसेंबरच्या मुदतीवर अडून राहू नये. मागासवर्ग आयोगाच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली. उपोषण सोडताना जी चर्चा झाली होती. त्यानुसार राज्यभरातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाही. अंतरवालीत १३२ पोलिसांनी लाठीमार केला. त्यांची चौकशी करण्यासाठी आमच्या तक्रारी नोंदवून घ्या. घराची जाळपोळ करणारे मराठा आंदोलक नव्हते असे आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात सांगितले आहे. त्यानंतरही निर्दोष आंदोलकांना अटक करीत आहेत. या प्रकारामुळे आंदोलनाला डाग लागला आहे, असे जरांगे म्हणाले. यावर आपण माहिती घेऊ असे आश्वासन महाजन यांनी दिले.
राज्य सरकारकडून कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे आंदोलन भरकटेल असा कोणताही निर्णय घेऊ नका, असे महाजन म्हणाले. यावेळी अंतरवाली येथे होणाºया बैठकीत सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे मनोज जरांगे म्हणाले. या चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, तरुणांना केलेले कर्जवाटप, विविध योजनांची माहिती असलेला प्रस्ताव जरांगे यांना यांना देण्यात आला़

 

Leave A Reply

Your email address will not be published.