वर्धातील ओबीसी महाएल्गार सभेला लोकांची गर्दी न जमल्याने ओबीसी नेत्यांचा सभास्थळावरून काढता पाय

0 122

वर्धातील ओबीसी महाएल्गार सभेला लोकांची गर्दी न जमल्याने ओबीसी नेत्यांचा सभास्थळावरून काढता पाय

वर्धा : ओबीसी भटके विमुक्त संघटनेतर्फे शनिवार दि़ १६ डिसेंबर रोजी दुपारी अकरा वाजता मंत्री छगन भुजबळ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दोन तास लोटूनही मंत्री भुजबळ सभा स्थळी न पोहोचल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या़ सभेला लोकांची गर्दी जमत नसल्याने त्यांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला असावा का अशी लोकांमध्ये कुजबूज झाल्याचे समोर येत आहे़ या एल्गार सभेकडे ओबीसी समाजातील लोकांनी पाठ फिरवल्यामुळे छाती ठोकून भाषण करणा-या नेत्यांना ओबाीसींनी नाकारले असावे का असा प्रश्न उपस्थित होत आहे़
आयोजित केलेल्या एल्गार सभेतील खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत विद्यालयाच्या पटांगणाकडे जाणारे रस्ते ओस पडले होते असे सांगण्यात येत आहे़. तर सभास्थळी उपस्थित असलेले नेते व्यासपीठावर बसून लोकांची वाट बघत बसल्याचे उपस्थितांकडून सांगितले जात आहे़. या ठिकाणी लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी गाणी मात्र मोठ्या आवाजात लावली होती़ मात्र त्याला ऐकण्यासाठी गर्दी नसल्याने व्यासपीठावरील नेत्यांना व आयोजक यांना ऐकण्याशिवाय पर्याय न उरल्याने या सभेचे हसू झाले अशी कुजबूज सुरू आहे़
सभा स्थळावर असलेल्या लोकांनी मंत्री भुजबळ येणार की नाहीत अशी विचारणा केल्यावर एक संयोजक दिवाकर गमे म्हणाले की, ते तर येणारच असे म्हणाले मात्र ते न आल्याने त्यांना रिकाम्या खुर्च्या पाहण्याचा योग न आल्याचेही बोलले जात आहे़.

ओबीसी समाजातील लोकांनी या सभेकडे पाठ
मराठवाड्यात आयोजित केलेल्या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या सोबत असणा-या नेत्यांनी मराठा समाजाबद्दल अक्षेपार्य आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याने येथे तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे़ त्यामुळे वर्धातील सभेतून मंत्री छगन भुजबळ यांच्या सभेने वातावरण दुषित होईल या कारणामुळे ओबीसी समाजातील लोकांनी या सभेकडे पाठ फिरवल्याचे अनेक जणांकडून बोलले जात आहे.

सभेत जाण्यास मज्जाव करण्यात आला असावा

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा केली जात असताना भुजबळ यांच्या भाषणाने परत वाद होवू नये म्हणून त्यांना सभेत जाण्यास मज्जाव करण्यात आला असावा, असाही उपस्थित मंडळीत चचेर्चा सूर होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.