जागृतीचा अखंड दीपक : गाडगे महाराज

0 34
जागृतीचा अखंड दीपक : गाडगे महाराज
नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक

मो. ९७६२६३६६६२ 

 

आजपर्यंत देव कोणच पहायला नाही, देव पहायची वस्तू नाही. जर देवच मानायचा असेल तर डाँ. भिमराव रामजी आंबेडकर यांना देव माना कारण त्यांनी देशाची ‘राज्यघटना’ लिहली असे सांगणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती.
गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती जिल्हात अंजनगाव सुर्जी तालुक्यात शेडगाव या गावी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी परीट समाजात झाला. बुध्द, संत तुकाराम, संत नामदेव महाराज, यांच्या विचारांचा वारसा चालवणारे महान संत म्हणून गाडगे महाराजांकडे पाहिले जाते. आताचे महाराजांसमोर गाडगे महाराजांचे नाव जरी घेतले तरी आजच्या भोंदु बुवा -बाबांना घाम फुटतो कारण की, गाडगे बाबांनी गावातील घाण साफ करत करत माणसांच्या मनातील व मेंदुतील घाण स्वच्छ करण्याचे कार्य केलेले आहे. गाडगे महाराजानी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्रित जेवण करण्याचा सामाजिक संदेश भंडारा या संकल्पनेतुन दिला. संत गाडगेबाबांनी बुध्दांच्या विचारांचा प्रचार – प्रसार केला होता. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे व गाडगेबाबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते.
गाडगे बाबांनी आपले घरदार सोडून आज या गावात तर उद्या दुस-या गावात विचारांची पेरणी करण्याचे काम केले. एके दिवशी किर्तन चालू असताना त्यांना पोस्टाने पत्र आले त्या पत्रात त्यांचा मुलगा मरण पावल्याचे लिहले होते, तरीपण ते पत्र वाचून बाबांनी स्वतःला सावरुन घेत किर्तन चालूच ठेवले आणि एक उत्स्फूर्त अभंग सांगितला,
“ऐसे मेले कोट्यानकोठी, रडू काय येथे एकाचीसाठी
बोला गोपाला – गोपाला, देवकीनंदन गोपाला !”
डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातही अशाच घटना घडल्या. आपली मुले मरण पावली पण समाजाच्या कल्याणाचे काम त्यांनी सोडले नाही.
गाडगेबाबा जिथे – जिथे ते जात तीथे – तिथे ते लोकांना शिक्षण घ्या असा उपदेश करीत. पण लोक त्यांना प्रतिप्रश्न करायचे की बाबा किती शिकायचे त्यावेळी ते म्हणायचे की, डाँ. बाबासाहेब आंबेडकरांएवढे शिका ! आणि वर म्हणायचे शिकुन बैल बनू नका तर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे बना ! गाडगे बाबांनी तथागत बुध्दाच्या विचारधारेचाच प्रचार – प्रसार केला. कारण तथागत बुध्द हे ओबीसी अर्थात भ्रमण संस्कृतीचे होते याची जाण गाडगे महारजांना होती.
ते किर्तनाच्या माध्यमातून अंधश्रध्दा व देवाविषयी सांगत की, ‘जगन्नाथ, रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहेत ! हे देव नाहीत.’ तसेच “तीर्थोत देव नाही, पैसाचा नास आहे. जे तीर्थाले जातील, त्यांना पैसाचा नास करण्यातच तीर्थ आहे.”
संत गाडगेबाबा ३० वर्ष पंढरपुरच्या आषाढी व कार्तिकीच्या वारीला गेले मात्र त्यांनी एकही उपवास धरला नाही व ते एकदाही मंदीरात गेले नाहीत. ते पंढरपुरला गेल्यानंतर दिवसभर चंद्रभागेच्या नदी तिरावरील घाण साफ करत व रात्रीला किर्तनाच्या माध्यमातून लोकांना प्रश्न विचारत त्यातील एक प्रश्न असा की, असा कसा देव आहे तुमचा जो की तो बोकडाचा लालची आहे. “दिवा मोठा कीं देव मोठा ? ते म्हणत की तुम्हाला जिता – जागता देव माहीत आहे का ? तो देव म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मांगा – महारांच्या पोरांना शिकवण्याचे काम केलं त्यांना देव माणा असा उपदेश करत. त्यांनी तीर्थात देव शोधण्याऐवजी माणसात देव शोधायला सांगितले. शिक्षणासंदर्भात सांगताना म्हणत की, “ज्याले विद्या नसेल त्याले खटा-याचा बैल म्हटलं तरी चालेल !”
प्रबोधनकार ठाकरे हे गाडगेमहाराजांचे अनुयायी होते. त्यांनी गाडगेमहाराजांचे चरित्र जिवंतपणी लिहले आहे. गाडगे महाराजांनी ‘जनताजनार्दन’ नावाचे मासिक काढले होते. त्याच्या संपादनाची जबाबदारी प्रबोधनकार ठाकरे यांनी सांभाळली होती. गाडगेबाबा हे निरक्षर होते, परंतु त्यांनी आपल्या विचाराच्या प्रसारासाठी ‘जनताजनार्दन’ मासिक काढले होते. ते एक महान संस्थापक संपादकसुध्दा होते.
गाडगेबाबा हे निरक्षर आसताना देखिल आज महाराष्ट्रातील अमरावती येथिल विद्यापीठाला संत गाडगेबाबांचे नाव आहे.
गाडगे बाबांची तुलना आजच्या बाबांशी करून पहीली तर असे लक्षात येईल की, आजचे बाबा गाडगेबांबाच्या नकाचीही बरोबरी करू शकणार नाहीत, हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. आजचे ‘बुवा – बापु – भोंदु बाबा’ सकाळी झोपेतून उठल्यापासूनच आस्था चँनेल च्या माध्यमातून अंध्दश्रध्दा पसरवण्याचे कार्य करताना दिसतात पण ते व्यभिचारी ढोंगी आहेत हे सिध्द ही झाले आहे व दररोज होताना दिसत आहे. त्यांना फळ देखिल भेटले आहे ते एकमात्र डाँ. आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे ते आज जेलची हवा खात आहेत.
गाडगेबाबांच्या विचारांचे आजपर्यत कोणत्याच ‘बुवा – बापु – बाबा’ यांनी आव्हान स्विकरले नाही किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
संत गाडगेबाबा यांच्या आवाजातील दि.०८ नोव्हेंबर, १९५६ रोजी वांद्रे पोलिस स्टेशन येथे झालेले त्यांचे किर्तन आजही युट्युबर उपलब्ध आहे मात्र आमचे बहुजनांतील तरूण – तरूणी का ? पाहत नाहीत प्रश्न पडतो. गाडगे महाराजांचे हे किर्तन म्हणजे क्रांतीवाणीच आहे. वैदीक गुलामीची बंधने तोडून स्वातंत्र्याचा व मानवी कल्याणाचा विचार करण्याची क्षमता यातून मिळते. हजारो ग्रंथांच्या माध्यमातून जे सांगता येणार नाही ते महाराजांनी केवळ एका कीर्तनातून सांगितले आहे.
गाडगे बाबा हे आजच्या संत्संग करणा-या बाबांसारखे नव्हते. गाडगे बाबांच्या पायाला कोणी स्पर्श करत असेल तर बाबा त्याला हातातील खराट्याने डोक्यात मारीत पण आजचे बुवा बाबांचा तर स्पेशल ‘दर्शन – प्रवचन’ सोहळा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडताना दिसतो कारण आमच्या बहुजन समाजाला गाडगे बाबा समजलेच नाहीत. ०६ डिसेंबर १९५६ ला डाँ. भिमराव आंबेडकरांच्या चैत्यभुमीवरील महापरिनिर्वानाची वार्ता कळली तेव्हा बाबांनी अन्नत्याग केला ते १३ दिवस उपाशी राहिले कारण की आंबेडकरांना हे जग बौध्दमय करायच स्वप्न अधुर राहिल होत. ‘आंबेडकर – गाडगेबाबा‘ यांच नात हे रक्ताच्या नात्यापलिकडे नाते होते. हे आता बहुजनांनी समजून घेणे काळाची गरज आहे
आजपर्यत जर आजच्या तरुणांना जर गाडगेबाबा व त्यांचे विचार समजले असते तर मंदीर बांधायला जे ६७००० तरूण मारण पावले गेले ते मरणच पावले नसते, आजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी गाडगे बाबांचे विचार आत्मसात केल्यास आमची बहुजनांची मुल “पहले मंदीर फिर सरकार” हे बोलणे तर सोडाच पण ऐकुणही घेणार नाहीत हे नक्की.
रेपे नवनाथ दत्तात्रय लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२
Leave A Reply

Your email address will not be published.