पुण्यात छात्रभारतीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0 58

पुण्यात छात्रभारतीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

पुणे : छात्र भारतीच्या वतीने पुणे येथील कलाकार कट्टा या ठिकाणी छात्रभारतीचा ४० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सुरूवातीला महापुरुषांना अभिवादन करून चळवळीतील गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यानंतर छात्र भारतीचे राज्य उपाध्यक्ष तुकाराम डोईफोडे व राज्य सचिव छाया काविरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, संघटक सौरव शिंपी, सदस्या वैष्णवी कोळी, बाबा क्षीरसागर, वैष्णवी शिंपी, वैभव रंधे, रवींद्र लामखेडे, प्रियंका ढगे, शुभम माळवे, आर्यन परब, संघर्ष पवार, जय ब्राम्हण, रामहरी रोकडे, वैभव गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाची सांगता ही सर्वांच्या उपस्थित केक कट करून करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.