तेलंगाणात कॉग्रेसची ११०० किमी पैदल यात्रा यात्रेदरम्यान बीआरएस वर निशाणा

0 48

तेलंगाणात कॉग्रेसची ११०० किमी पैदल यात्रा
यात्रेदरम्यान बीआरएस वर निशाणा

हैदराबाद : काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडे यात्रेला मिळालेल्या प्रतिसादानंतर तेलंगाणा काँग्रेसचे आमदार भट्ठी विक्रमार्क यांनी राज्यातील लोकांना जोडण्यासाठी दि़ १६ मार्च रोजी पैदल यात्रेला सुरूवात केली होती, त्याला आज दि़ २१ जून रोजी १०० दिवस पुर्ण झाले असून यात ११०० किमीचा प्रवास  झाला आहे.
भट्टी विक्रमार्क यांनी काढलेली यात्रा ही आदिलाबाद जिल्ह्यातील पिंपरी गावातून सुरू झाल्यानंतर ती तेलंगाणातील १५ जिल्ह्यातील ३३ मतदार संघातून जवळपास ८०० गावातून गेली़ या यात्रेत अनेक राज्यातील कॉंग्रेस नेते सहभागी झाले होते़ या यात्रेत अनेक ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आल्या त्यावेळी एक लाखापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती़
या यात्रेच्या पहिल्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे उपस्थित होते़ तर दुसर्या सभेला हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर स्ािंह सुक्खू हे उपस्थित होते़ त्याशिवाय या यात्रेत आविासी, दलित,अल्पसंख्यांक, शेतकरी, बेरोजगार तरूण, खान कामगार हे मोठ्या संख्येने सामिल झाले होते़
या पदयात्रेदरम्यान पट्टी यांनी मनचेरियल येथिल श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाला भेट देऊन रामागुंडम, धर्मपूरी, हुजूराबाद, हुस्नाबाद, वर्धनपेटा या विधानसभा मतदार संघात पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त पिकाची पहाणी करून नुकसानग्रस्त शेतक्यांच सात्वंन केल़ त्यानंतर त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यानी दिलेल्या निमंत्रणारून विद्यापीठात भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
भट्टी यांनी आपल्या शंभर दिवसाच्या पदयात्रेत त्यांनी बीआरएस सरकारला निशाणा करत समाचार घेतला़ या यात्रेला तेलंगाणाचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांचेसह इतर काँग्रेस नेत्यांनी भट्टी यांची पदयाचा ही यशाचा मार्ग दाखवणारी आहे अस म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.