पश्चिम बंगाल हिंसाचाराची सीबीआय चौकशी कोलकात्ता उच्च न्यायालयाचा आदेश

0 59

पश्चिम बंगाल हिंसाचाराची सीबीआय चौकशी
कोलकात्ता उच्च न्यायालयाचा आदेश

कोलकात्ता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीचे अर्ज भरतेवेळी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती़ त्यामुळे आदेश कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती अमृता सिंह यांनी हिंसाचाराच्या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात पंचायत निवडणूकीचे अर्ज भरतेवेळी हिंसाचाराची घटना घडली ही घटना सत्ताधारी पक्षाच्या वतीने केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी करत या घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी याचिका कोलकात्ता उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर कारण या घटनेमुळे अनेक उमेदवाराची नावे गायब झाल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला आहे.
न्यायालयाने निवडणूकीचे अर्ज दाखल करतेवेळी झालेल्या हिंसाचाराची संपूर्ण माहीती मागितली असून या मतदानाच्या आधी एक दिवसापर्यंत ही कागदपत्रे देण्याचे आदेश दिले आहेत़ तसेच न्यायालयाने पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाला पंचायत निवडणुकीसाठी २४ तासात ८२ हजार केंद्रीय दलाच्या सैनिकांची मागणी करण्याचे निर्देश दिले आहेत़
हिंसाचाराच्या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष करत होते त्यात भाजप, काँग्रेस आणि सीपीएम यांचा समावेश होता़ या हिंसाचारामुळे काही उमेदवारांची नावे उमेदवारांच्या यादीतून गायब झाली असल्याचाही यांनी आरोप केला आहे़ कारण निवडणूक आयोगाकडून वेबसाईडवर अपलोड केलेल्या यादीत या उमेदवारांची नावे नाहीत़
कागदपत्रात छेडछाड केल्याचा आरोप
पंचायत निवडणूक अर्ज दाखल करतेवेळी निवडणूक अर्ज दाखल करून घेणाया अधिकारी यांनी कागदपत्रात छेडछेड केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांने केली असून याची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी  आहे़
नावाचा समावेश करावा
निवडणूक आयोगाने आपल्या यादीत ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश केला नाही त्यांनी तात्काळ समावेश करून यादी अद्यावत करावी अशा सूचना न्यायमुर्ती अमृता सिंह यांनी दिल्या आहेत़़

Leave A Reply

Your email address will not be published.