जिजाऊ ब्रिगेडची राज्य पदाधिकारी बैठक उत्साहात संपन्न

0 261

जिजाऊ ब्रिगेडची राज्य पदाधिकारी बैठक उत्साहात संपन्न

आढाव्यासह विविध विषयांवर झाली चर्चा

 

वाशिम : मराठा सेवा संघ प्रणित महिलांचे वैचारिक संघटन मानल्या गेलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक येथे नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती माधुरीताई भदाणे या होत्या. या बैठकीचे उद्घाटक म्हणून मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवश्री अशोकराव महाले हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा विदर्भ विभाग प्रमुख शिवमती सीमाताई बोके, राज्य मार्गदर्शक सत्यभामाताई पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष शिवमती इंदूताई देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष कीर्तीमालाताई चौधरी, ज्योतीताई कोथळकर, प्रदेश सहसचिव कांचनताई उल्हे जयश्रीताई शितोळे, प्रदेश सदस्य सुरेखाताई राऊत, शीलाताई पाटील, अकोला विभाग अध्यक्षा संजीवनीताई बाजड, अमरावती विभाग अध्यक्ष अश्विनीताई देवके आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वाटचालीबद्दल आढावा सादर करण्यात आला. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यात केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. जिजाऊ ब्रिगेडने संपूर्ण पदाधिकाऱ्यांसाठी एक आचारसंहिता तयार केली असून त्यानुसार सर्वांनी अंमलबजावणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडचे वेगवेगळे उपक्रम हे प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याबाबत चर्चा देखील यावेळी करण्यात आली. मराठा सेवा संघाने सांगीतलेल्या पंचसत्ता प्रत्यक्षात ताब्यात घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याबाबत नियोजन करण्यात आले. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर जाऊन संघटनेच्या हिताला बाधा पोहोचेल अशा प्रकारचे लिखाण करू नये याबाबत स्पष्ट भूमिका ठरवण्यात आली असून अशा पदाधिकाऱ्यांना किमान दहा वर्षे संघटनेतून बेदखल करण्याबाबतचा ठराव या बैठकीत सर्वांनुमते घेण्यात आला. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यापुढे वेगवेगळे उपक्रम राबवणे आवश्यक असून त्या दृष्टीने प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी कृती कार्यक्रमाची आखणी करून तो अंमलात आणावा. तसेच प्रत्येक जिल्हाध्यक्ष ह्या सक्षम असल्याच पाहिजे या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्षांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल त्यांचा जिजाऊ ब्रिगेड राज्य कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीमध्ये वर्धा जिल्हाध्यक्ष योगिताताई इंगळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष ज्योतीताई जाधव, अकोला जिल्हाध्यक्ष रेणूताई गावंडे, वाशिम जिल्हाध्यक्ष अनिताताई कोरडे, अमरावती पूर्व जिल्हाध्यक्ष मनालीताई तायडे, पश्चिम जिल्हाध्यक्ष लिनताताई पवार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सरोजताई देशमुख, अहमदनगर जिल्हाध्यक्ष संपूर्णाताई सावंत, लातूर जिल्हाध्यक्ष ताईबाई बोराडे व योगिनीताई ठाकूर, हिंगोली जिल्हाध्यक्ष कांताबाई कल्याणकर यांनी उत्कृष्ट आढावा सादर केल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या बैठकीचे सूत्र संचालन जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय कार्याध्यक्षा सुरेखाताई आरू यांनी तर प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष संजीवनीताई बाजड यांनी व आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्षा वैशालीताई बुंधे यांनी पार पाडले. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष अनिताताई कोरडे, माजी विभागीय अध्यक्ष सविताताई मोरे व विभागीय सचिव सविताताई बोरकर यांच्या पुढाकारात जिल्हा सचिव सुनिताताई कढणे, ज्योतीताई इढोळे, प्रतिभाताई इंगळे, दिपालीताई मापारी, मीनाताई बोरचाटे तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे व त्यांचे सहकारी आणि संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजाननराव भोयर व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.