कर्नाटकात माकड ताप आजाराचे ३१ रुग्ण  – आजाराने बाधित असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सामान्य

0 15
कर्नाटकात माकड ताप आजाराचे ३१ रुग्ण 
– आजाराने बाधित असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सामान्य
नवी दिल्ली : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात माकड ताप या आजाराचे ३१ रुग्ण आढळले आहेत. याची लागण झालेल्या १२ रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर काही लोकांवर घरी उपचार सुरू आहेत. या आजाराने बाधित असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले जात आहे.
मंकी फीव्हर हा आजारमधील विषाणू हा फलेविविरिडे कुटुंबातील आहे. त्याला कायसनूर वन रोग असेही म्हणतात. तो माकडांद्वारे पसरतो, म्हणजेच जेव्हा एखादा मनुष्य संसर्ग झालेल्या प्राण्याच्या संपर्कात येतो तेव्हा तो या आजाराचा बळी होऊ शकतो. हा ताप १९५७ मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला. या रोगाचे नाव कर्नाटकातील कायसनूर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. साधारणपणेलोक याला माकड फिव्हर म्हणू लागले कारण त्यामुळे अनेक माकडांचा मृत्यू झाला होता.
माकडतापासाठी पर्याय म्हणजे लस
सध्या माकडतापासाठी एकमेव पर्याय म्हणजे त्याची लस, जी एका महिन्यात दोन डोसमध्ये दिली जाते. जंगलात किंवा आसपास राहणाºया लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो कारण हा विषाणू बहुतेक फक्त जंगलात आढळतो. जनावरांशी संपर्क टाळून स्वच्छतेची काळजी घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येतो.
आजाराची लक्षणे
उच्च ताप, थंडी जाणवणे, स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखीची समस्या, उलट्या होणे, रक्तस्त्राव समस्या, प्लेटलेट्स कमी होणे, डोळा दुखणे आणि सूज येणे अशी लक्षणे या आजाराची आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.