मंत्री भुजबळ यांच्या नाभिक समाजाच्या बद्दल “भादरने’ या वक्तव्यांचा जाहीर निषेध !

0 132

मंत्री भुजबळ यांच्या नाभिक समाजाच्या बद्दल “भादरने’ या वक्तव्यांचा जाहीर निषेध !

भागवतराव सोनवणे , येवला
( 8806272733

भादरने म्हणजे अपवित्र काम किंवा अंग वस्त्रा ने झाकलेल्या ठिकाणचे नको असलेले केस कर्तन असं भुजबळ यांना अभिप्रेत असावे म्हणून त्या कामाला त्यांनी घाणेरडे काम समजून आणि माझें नाभिक बांधव आजवर हे अपवित्र काम करत आले असावे, असा *भुजबळ यांनी गृहीत धरून माझ्या नाभिक बांधवांच्या व्यवसायाचा व त्यांच्या जातीचा जाहीर अपमान केला आहे.

भुजबळ च्या या अभद्र वक्तव्या नंतर उपस्थित ओबीसी बांधवांनी जो काही टाळ्या आणि शिट्या वाजवंत जो घोष केला त्यावरून भादरने हे अभद्र काम आहे यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

माझ्या नाभिक बांधवांच्या जातीय भावना दुखावल्या बद्दल मी मंत्री भुजबळ यांच्या जाहीर निषेध करतो..

मंत्री भुजबळ आपण किती ही तेढ निर्माण करा, गावगाडयात आम्ही सर्व ओबीसी ( मराठा सुद्धा आता ओबीसी ) आहे, गुण्या गोविंदांने राहत आहोत..

तुम्ही मराठ्यांची भादरू नका असे घाण , किळसवाणे वक्तव्य केले असले तरी मी माझ्या नाभिक बांधवाना नम्रपणे सांगतो की , भादरने म्हणजे भद्र हे पवित्र काम असून भुजबळ यांच्या मेंदूत सध्या घाण घुसली आहे..

यज्ञ करण्यापूर्वी नको असलेल्या सर्व जागांचे केस काढणे हे शुद्धी कर्म आहे…
तसेच सुतक समाप्ती नंतर , किंवा पिंड दाना पूर्वी केस काढून टाकल्या ने व्यक्ती भद्र म्हणजे पवित्र आणि शुद्ध होतो, म्हणजे आपले काम एक देव कर्म असून आपण भुजबळ चे ऐकून भद्र कर्म थांबवू नये..

उलट पक्षी भ्रष्ट भुजबळ यांना विचारावे की, आम्ही भादरने थांबविल्यावर भुजबळ काय महिना पगार चालू करणार आहे काय ?

भुजबळ च्या या जातीय वादी व नाभिक समाजाला अपवित्र वक्तव्याचा जाहीर निषेध.

भागवतराव सोनवणे , येवला
( 880627273

Leave A Reply

Your email address will not be published.