जनावरांच्या चाºयाच्या प्रश्न गंभीर होण्याची शक्यता -जिल्ह्यात चारा वाहतुक करण्यास बंदी

0 26
जनावरांच्या चाºयाच्या प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
-जिल्ह्यात चारा वाहतुक करण्यास बंदी
परभणी : या वर्षी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाºयाच्या प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात चार टंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि एकुण मिक्स रेशन यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने चाºयाची टंचाई गंभीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार दिनांक १ एप्रिल, २०२३ पासुन ३ लाख ६५ हजार १७४ मे. टन चारा शिल्लक असुन तो अंदाजे एप्रिल २०२४ पर्यंत पुरेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, एकुण मिक्स रेशन वाहतुकीवर बंदी आणल्यास एप्रिल, २०२४ अखेर पर्यंत चारा टंचाई भासणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि एकुण मिक्स रेशन यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
चारा वाहतुक करण्यास मनाई
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील उत्पादीत होणारा चारा, मुरघास, आणि एकूण मिक्स रेशन यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई केली आहे. सदरचा आदेश निर्गमित करण्यात आल्याच्या दिनांकापासुन पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.