वाडीतील इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर – मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचे आवाहन

0 246

वाडीतील इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

– मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचे आवाहन

 

खामगाव (नंदकिशोर भारसाकळे): तालुक्यातील वाडी येथे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबाने शासन दरबारी मदतीसाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे, पण त्यांच्या पदरात पडली केवळ निराशाच.  गणेश विठ्ठल राव इंगळे आणि त्यांच्या पत्नी वंदना गणेश इंगळे दोन मुली आणि एक मुलगा ऐवढे जण कुटुंबात राहतात.

या कुटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, कुटुंबप्रमुख वंदना इंगळे यांना चौथ्या स्टेजमध्ये कँसर असून गणेश इंगळे हे कंबर (मनका) आजाराने त्रस्त आहेत. या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि परिवार चालवणे कठीण झाले आहे. मोलमजुरी करून जीवन जगणारे कुटुंब आज रोजी जमा असलेले पैसा पुंजी दवाखान्यात लावून बसलेत. या कुटुंबाची आपबीती ग्रामोन्नती चे खामगाव तालुका प्रतिनिधी नंदकिशोर भारसाकळे यांनी त्यांच्या घरी जाऊन व्यथा समजून घेतल्या आहेत.

गणेश इंगळे यांनी पक्ष नेते सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्ती आणि सरकार यांना मदतीसाठी आर्त हाक दिली आहे ज्यांना मदत करायची भावना असेल त्यांनी 9011647621 या नंबर वरती विचारणा करून मदत करावी असे त्यांनी बोलतांना आव्हान केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.