लातूर विभागात चालकांची अल्को टेस्ट – पथकांमार्फत अल्को टेस्ट, चालकांना प्रवाशांची काळजी

0 8

लातूर विभागात चालकांची अल्को टेस्ट
– पथकांमार्फत अल्को टेस्ट, चालकांना प्रवाशांची काळजी

 

लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत विविध योजना राबवून प्रवाशी संख्येत वाढ केली जात आहे़ या प्रवाशांच्या काळजीसाठी वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शी़ ऩ जगताप यांनी राज्यातील सर्व बसचालकांची अल्को टेस्ट मशिन्सद्वारे तपासणी करण्याचे निर्देश दिले होते़ यामुळे लातूर विभागाने नऊ पथकांद्वारे चालकांची तपासणी केली असता, यात एकही वाहनचालक मद्य प्राशन केल्याचे आढळले नाही़ यामुळे चालकांना प्रवाशांची काळजी असल्याचे समोर आले असून लातूर विभाग गौरवास पात्र ठरला आहे़
वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शी़ ऩ जगताप यांनी अल्को टेस्ट मशिनद्वारे वाहकांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते़ यानंतर लातूर विभागाच्यावतीने ३१ आॅगस्ट रोजी सांयकाळपासून ते १ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत नऊ पथकांकडून तपासणी करण्यात आली़ या पथकांमध्ये अहमदपूर, उदगीर, लातूर, निलंगा, औसा या आगाराचे प्रत्येकी एक पथक आणि फिरत्या तीन व बसस्थानक क्रमांक २ वरील एक अशा नऊ पथकांकडून अल्को टेस्ट करण्यात आली़ या पथकांकडून लातूर आगारातील २१८ व उदगीर आगारातील २७१ चालकांची अल्को टेस्ट मशिन्सद्वारे तपासणी करण्यात आली़
लातूर विभागातील एकूण नऊ पथकांकडून ४८९ चालकांची अल्को टेस्ट मशिन्सद्वारे तपासणी केली़ यावेळी एकाही वाहक चालकाने मद्य प्राशन केल्याचे निदर्शनास आले नसल्याने, लातूर विभाग गौरवास पात्र ठरला आहे़ या विभागातून अनेक खेडेगावात मुक्कामी बस पाठवल्यात जातात़ या मुक्कमी गेलेल्या चालकावरही या पथकाने करडी नजर ठेवत त्यांची तपासणी केली़
यापुर्वी मुक्कामी बस घेऊन जाणारे अनेक चालक मद्य प्राशन करत असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्या होत्या़ यामुळे कर्तव्यावर असलेल्या चालकांच्या या गैरकृत्यावर जरब बसण्यासाठी वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शी़ ऩजगताप यांनी अल्को टेस्ट मशिन्सद्वारे चालकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते़ यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करत पथकाने चालत्या बस थांबवून चालकांची तपासणी केली़ यात लातूर विभागातील एकही बस चालक मद्य प्राशन केल्याचे आढळले नाही़

Leave A Reply

Your email address will not be published.