मराठा आंदोलकांना मारहाण, लातूरमध्ये तीव्र पडसाद – बंदमुळे शहारातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट

0 35

मराठा आंदोलकांना मारहाण, लातूरमध्ये तीव्र पडसाद
– बंदमुळे शहारातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट

 

लातूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न मागिल अनेक वर्षापासून प्रलंबित आहे़ आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय व्हावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे बसलेल्या मराठा आंदोलकावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला़ यामुळे लातूरमधील मराठा संघटनांकडून रस्त्यावर येत निषेध व्यक्त करत निदर्शने दिली़
मराठा संघटनांनी शहरातील छत्रपती शिवाजी महराज चौक येथे एकत्रित येऊन लातूर बंदची हाक दिली़ यामुळे शहरातील अनेक महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली़ या बंदमुळे रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाला़ यावेळी संघटनांकडून अंतरवली येथील घटनेचा निषेध व्यक्त करत़ पोलिसांना आदेश देणाºया अधिकाºयांना निलंबित करावे, राज्य सरकारने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली़
मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंबड व गेवराई तालुक्यातील जवळपास १२३ गावांनी आंदोलनास सुरूवात केली होती़ या आंदोलकांना सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन येत अनसल्याने त्यांनी आपल्या मागण्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र जिरंगे यांची तब्येत बिघडत चालल्यामुळे पोलिसांकडून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जात होती़ पोलिसांकडून केल्या जाणाºया विनंतीला प्रतिउत्तर न दिल्याने पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली़
गृहमंत्री फडणवीस असतात त्यावेही मुडदेच पडतात
मराठा संघटनांकडून लातूर शहरात पुकारलेल्या बंदवेळी मराठा आंदोलनाविषयी बोलताना मराठा सेवा संघाचे जिल्हध्यक्ष रोहन जाधव म्हणाले की, ज्या ज्या वेळी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे फडणवीस यांच्या हाती येतात, त्या त्या वेळी राज्यात सर्वत्र दंगली आणि मुडदेच पडतात, असे म्हटले़
सरपंचाकडून स्वत:ची गाडी पेटवून निषेध
मराठा आंदोलकावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असणाºया गेवराई पायगाममधील सरपंचाने स्वत:ची गाडी पेटवून देत निषेध केला़

 

Leave A Reply

Your email address will not be published.