महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावर हल्ल्याचा डाव – मनोज जरांगेचा देवेंद्र फडणवींसावर कान फुकणारी आत्या म्हणत हल्ला

0 62
महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावर हल्ल्याचा डाव
– मनोज जरांगेचा देवेंद्र फडणवींसावर कान फुकणारी आत्या म्हणत हल्ला
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सरकारने दडपशाही सुरू केलीय, तीन-चार दिवस बघु, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील  यांनी केला आहे. असं ८-९ तारखे पर्यत समाजाने शांत रहावे, असे आवाहन मनोज जरांगेनी केले आहे. महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावर हल्ल्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप, मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. पोलीस बोर्ड काढत आहेत यावर बोलताना ते म्हणाले की, बोर्ड का काढलेत, त्यात गोळ्या घाला लिहिले आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे.
बीड जिल्ह्यातील वानगाव फाटा येथील बैठकीआधी प्रसारमाध्यमांना बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावर हल्ला करण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप जरांगेनी केला आहे. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून, एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचे काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही, असं म्हणत जरांगेनी देवेंद्र फडणवीस यांचेवर हल्ला केला. फडणवीस यांनी पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे. त्यांच्या सांगण्याबरून बॅनर बोर्ड काढले जात आहेत. बोर्ड काढल्यामुळे लोक नाराज होऊ लागलेत, तुम्हाला तुमचे बोर्ड तर, लावावे लागतील ना, असंही जरांगेनी म्हटलं आहे.
मी हॉस्पिटल मधून बाहेर का आलो?
मी हॉस्पिटल मधून बाहेर का आलो? दवाखान्यात अ‍ॅडमिट असल्यावर चौकशी होत नाही, लोक चौकशीसाठी दवाखान्यात पळून जातात, पण मी मुद्दाम एसआयटीच्या चौकशीसाठी बाहेर आलो, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दारात यायचं नाही, पॅम्प्लेट चिटकवा
मराठ्यांनी गावागावात तालुक्यात ग्रुप बनवून आपापल्या घराला पोम्प्लेट चिटकावयाचं, माझ्या दारात यायचं नाही, असं त्यावर लिहायचं. घर-गाड्यांवर पॅम्प्लेट चिटकवण्याची मोहीम सुरू करा. सरकारने गुन्हे दाखल करण्याचा नवीन डाव सुरू केलाय, सरकारचा हा शेवटचा डाव आहे, तो म्हणजे गुंतवणे. यासाठी आपल्या घरावर पॅम्प्लेट चिटकवण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
गृहमंत्री पोलिसांचे कान फुकत आहेत
चार महिन्यांपूर्वी गुन्हे केलेली मुले उचलू लागलेत. आत्त्या जशी कान फुकते, तसे गृहमंत्री पोलिसांचे कान फुकत आहेत.
बीड जिल्ह्यात ३४०० उमेदवार उभे राहणार
निवडणुकीत एकट्या बीड जिल्ह्यात ३४०० उमेदवार उभे राहणार आहेत, मग काय डांबरीवर बॅलेट पेपर अंथरणार का, असा प्रश्न जरांगेनी उपस्थित केला आहे. राजकीय अजेंडा माझा नाही, फॉर्म कोणीही भरू शकतो, तो लोकशाहीचा अधिकार सर्वाना आमदार खासदार व्हावं वाटत. मी राजकीय मार्गात पडनार नाही, मी समाजाचा मालक नाही. ८-९-तारखेपर्यत वाट बघणार आहोत, नंतर आंदोलन करणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.