शासनाने किती जरी धमकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना घाबरणार नाही – उपमुख्यमंत्री यांनी आता शहाण व्हाव, मनोज जरांगे यांचे फडणवीस यांना आवाहन

0 77

शासनाने किती जरी धमकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना घाबरणार नाही
– उपमुख्यमंत्री यांनी आता शहाण व्हाव, मनोज जरांगे यांचे फडणवीस यांना आवाहन

भूम : उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आता शाहण व्हावं सगे-सोयºयांची आधी सूचना अंमलात आणून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे. आपण मला साथ द्या मी यांच्या छाताडावर बसून ओबीसीतून आरक्षण घेणार. शासनाने मला किती जरी धमकवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना घाबरणार नाही, मी जातीवंत मराठा आहे, असे  मराठा आरक्षण योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी भूम येथील संवाद बैठकीत सांगितले.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमची एसआयटी चौकशी लावली तर चालेल, परंतु यासाठी चौकशी मध्ये तुमच्याच लोकांची नावे पुढे येतील याची सुद्धा आपण सहनिशा करावी. मराठ्यांची मुळात दहा टक्के आरक्षण मागणीच नव्हती तुम्ही आम्हाला कशामुळे दहा टक्के आरक्षण देता. आमच्या हक्काचं सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसी वर्गातूनच आम्हाला मिळाव अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. मराठा आमदारांना विनंती करताना ते म्हणाले की, आपण सर्वांनी शासनाला धारेवर धरत मराठा समाजाबद्दल सगे स्वर्याच्या अधिवेशनावर व आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळावे यासाठी तगादा लावावा. परंतु आपल्याच या मराठा आमदारांनी मला मराठा समाजाला सहकार्य न करता शासनाच्या बाजूनेच बोलू लागले आहेत. मी त्यांच्या नेत्यांना बोललो की यांना लागू लागले, या लोकांना नेत्यांबद्दल प्रेम आहे. पण जातीबद्दल अस्मिता नाही का? परंतु हे माझ्या वरती बोलू लागले आहेत का हो साहेब या मराठ्यांनी आपल्याला मतदान केले नाही का मराठ्यांचे आपल्याशी काही घेणं देणं नाही का म्हणून आगामी काळात जसे आपल्याला शासनाने चलो मुंबई चलो भूम चलो धाराशिव आसे बोर्ड काढले व काढावयास भाग पाडले त्याचे कारण आपण सार्वजनिक ठिकाणी ते लावले होते.
आपल्या गावातील झेरॉक्स दुकानांमधून झेरॉक्स पेपर वर एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा असे मोठ्या अक्षरात लिहून माझ्या घरी एकही पुढºयाने येऊ नये अशी फलक आपल्याच घरावर तसेच मोटरसायकल वरती लावण्याचा सूचना ही त्यांनी यावेळी मराठा समाजाला केली. आपल्या जागेवर कुणाचे चालत नाही कारण ही आपली प्रॉपर्टी आहे. शासनाची नाही असाही मोलाचा सल्ला मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
शासनाच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार
सर्वांची पुन्हा मला गरज आहे. आपण सर्वांनी जसे मला तीन महिन्यापूर्वी सहकार्य करीत अंतरवलीमध्ये जमलात तसेच काही दिवस मला सहकार्य करावे मी या शासनाच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी शांततेत लढा देणारे देत राहावे शांततेत सर्व कामे करावी असेही आव्हान म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना सांगितले.
मराठा समाजाच्या मायेने कुटुंब, लेकराची आठवण होत नाही
आपण मला साथ द्या मी यांच्या छाताडावर बसून ओबीसीतून आरक्षण घेणार शासनाने मला किती जरी धमकवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना घाबरणार नाही मी जातीवंत मराठा आहे असे सांगीतले. मनोज जारांगे पाटील यांची भावनिक साद सध्य माझ शरीर मला साथ देत नाही. दररोज सलाईन घेतल्या शिवाय चालता येत नाही, मला अजून काही दिवस शरीराने साथ द्यावी असे उदगार काढत या मराठा समाजाची माझ्यावर इतकी माया आहे की मी माझे कुटुंब, लेकराची आठवण होत नाही. या समजासाठी माझा जीव जरी गेला तरी मी मागे सरणार नाही, असा शब्द त्यांनी मराठा समाजाला दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.