बीड लोकसभेसाठी ५ हजार उमेदवार देणार – मोदी-शहा विरोधातही फॉर्म भरण्याची तयारी – आयोजित बैठकीत मराठा समाज आक्रमक

0 395
बीड लोकसभेसाठी ५ हजार उमेदवार देणार
– मोदी-शहा विरोधातही फॉर्म भरण्याची तयारी
– आयोजित बैठकीत मराठा समाज आक्रमक
बीड : सगे सोयरे अध्यादेशाची आमंलबजावणी करावी अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सरकारकडे करीत आहेत. मात्र या मागणीकडे राज्यसरकार करत असल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. येणाºया लोकसभा निवडणुकीपूर्वी जर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, येऊ घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा बांधव हजारो उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बीड लोकसभेसाठी प्रत्येक गावातून २ अर्ज, ५००० उमेदवार देणार आहेत. याशिवाय मोदी -शाहविरुद्धही फॉर्म भरले जाणार असा निर्णय बीडमध्ये मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला.
     आगामी लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून २ उमेदवार अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे फक्त मराठा समाजातीलच उमेदवार नाही तर इतर समाजातील देखील लोकांना देखील या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभे करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाजचं सरकारला घेरणार आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचे ठराव घेण्यात आले असून जोपर्यंत सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एकमताने ठरवण्यात आल आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अहमदनगर येथील मराठा समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक पार पडली.
हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार 
अहमदनगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्वाचे ठराव घेण्यात आले. येणाºया घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर  लोकसभा निवडणुकीत प्रत्येक  मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
प्रचार-प्रचार उमेदवाराला मतदान न करण्याची शपथ
लोकसभा निवडणूकीत मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठींबा न देणाºया कोणत्याही उमेदवाराचा प्रचार आणि प्रचार सभेत सहभागी होणार नाही, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नाही अशी शपथ घेण्यात आली.
प्रत्येक मराठा बांधवाची चौकशी करा
मराठा आरक्षणाची मागणी करणाºया जरांगे पाटील यांना ईडी लावता येत नसल्याने त्यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटी गठीत केली जाणार आहे. या एसआयटी संदर्भात प्रत्येक मराठा बांधव आमची देखील चौकशी करा, अशी मागणी करणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.