अंजनडोह येथे ईद-मिलाफ कार्यक्रमातून हिंदु-मुस्लिम बांधवांनी दिले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

0 272

अंजनडोह येथे ईद-मिलाफ कार्यक्रमातून हिंदु-मुस्लिम बांधवांचे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

 

किल्ले धारूर : तालुक्यातील अंजनडोह येथे रमजानच्या पवित्र महिन्यात हिंदु बांधवांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवांना इफ्तारची पंगत देऊन सर्वधर्मसमभाव हे राष्ट्रीय मुल्य जोपासले होते तर मुस्लिम बांधवांनी रमजान ईदच्या दिवशी सर्व गावकऱ्यांना मस्जीद मध्ये आमंत्रित करून गावकऱ्यांसोबत शूरखुर्मा पार्टी करून रमजान ईद च्या दिवशी सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम राहील असा आदर्श घालून दिला.

गावात आजपर्यंत सातत्याने सामाजिक व राष्ट्रीय संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सध्या सामाजिक परिस्थिती मध्ये सर्व धर्माच्या बांधवांनी आपली राष्ट्रीय एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता, अबाधित राखणे ही सर्वांची जवाबदारी आहे. दोन्ही समाजाकडून आप-आपसात सदभावना आणि बंधु प्रेम असेच कायम रहावे, अशी प्रार्थना ईदच्या निमित्त मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली. ईदची नमाज मौलाना मोहसीन शेख यांनी अदा केली. प्रत्येक हिंदु बांधवांना घरी बोलावुन शूरखुर्मा देण्याऐवजी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी मज्जीद मध्ये ईद-मिलाफ कार्यक्रमाचे आयोजन करून गावातील सर्व जाती धर्माच्या बांधवासाठी शूरखुर्मा व गुलगलेची मेजवानी देत एकतेची पंगत मांडली. या दोन्ही राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणाऱ्या उपक्रमाचे तालुक्यासह जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत असुन असे कार्यक्रम होत राहीले तर विषमतेची दरी नक्कीच कमी होईल.

ईद-उल-फित्र हा उत्सव उपवासाच्या महिन्याची समाप्ती करतो, ज्यात श्रद्धाळू लोकांनी आपला वेळ प्रार्थना करण्यात, ईश्वराकडे क्षमा आणि दयेची याचना करण्यात घालविला आहे. अनेकांसाठी रमजान हा संयम आणि शिस्तीचे प्रतीक आहे. हजरत मुहम्मद पैगंबरांनी कुराणाच्या माध्यमातून सांगितलेला जगण्याचा मार्ग आणि शिकवण आचरणात आणुन आपल्या आयुष्याचे रमजान महिन्यात सार्थक होते, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस तथा ह.भ.प.प्रा.ईश्वर मुंडे यांनी असे विचार व्यक्त करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी हिंदु बांधवाकडून इफ्तारची पंगत व मुस्लिम बांधवाकडून सार्वजनिक शूरखुर्माचे केलेले आयोजन हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक असुन, गावातील सर्व समाज एकोप्याने राहतात हा अंजनडोहकरांचा उपक्रम आदर्शवृत्त आहे अशा भावना व्यक्त करून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या शुरर्खूमा पार्टीला आवर्जुन उपस्थित असलेले आदर्श शिक्षक मच्छिंद्रनाथ सोळंके यांनीही आपले मत व्यक्त करताना म्हटले की, आम्ही गावकरी सर्व एकमेकांचे बांधव आहोत या भावनेने वागतो. त्यामुळे सामाजिक ऐक्य दुषित करणा-या विकृतींना गावकरी थारा देत नाहीत. विधायक कामासाठी गावकरी नेहमी तत्पर असतात, त्यामुळे गावाचे ऐक्य कायम आहे. सर्व गावकरी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात आणि गुण्या गोविंदाने राहतात. तर गावच्या प्रथम नागरिक सरपंच उषाताई सुर्यकांत सोळंके यांनी असे सण साजरे झाले तर गावचा विकास होण्यास मदत होईल म्हणत सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

मस्जिद मध्ये आयोजित केलेल्या शिरकुर्मा पार्टीला माजी सभापती सुदर्शन अण्णा सोळंके, माजी सरपंच सुभराव सोळंके, शिवकृपा आडत दुकानचे मालक व माजी सरपंच नितीन कांबळे, माजी सरपंच राजेभाऊ हतागळे तसेच सध्याचे उपसरपंच प्रकाश सोळंके, मजुर फेडरेशनचे संचालक युवराज कांबळे व ग्रामपंचायत सदस्य सुधीर सोळंके, संदीप शिंपले, दयानंद आदमाने, बाबासाहेब काळे, दत्तात्रय ठोके यांच्यासह शिवसेनेचे धारूर तालुका उपप्रमुख राजेभाऊ सोळंके यांनीही यावेळी ईदच्या शुभेच्छा देऊन मुस्लिम बांधवांशी गळाभेट केली.
यावेळी प्रमोद सोळंके, अमर सोळंके, प्रवीण सोळंके, अनिल सोळंके, दत्तात्रय सोळंके, सुर्यकांत सोळंके, कमलाकर सोळंके, अशोक सोळंके, अनसर शेख, शब्बीर सय्यद, चाँद सय्यद, हनुमंत अदमाने, सलावद्दीन सय्यद,सलिम पठाण, शबीर पठाण, रतन अदमाने, विवेक अदमाने, युनूस सय्यद, बाळासाहेब पंचभाई, सादेक सय्यद, रामराव कांबळे, धर्मराज गायके, श्रीधर सोळंके, माऊली सोळंके, सुनील पाटील, प्रकाश मुकादम, बिबीशन सोळंके, शफिक सय्यद यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी शेख असाहबोद्दीन यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.