भक्तीशक्ती शिवतीर्थ मैदान वाचवण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने वतीने स्वाक्षरी मोहीम

0 119

भक्तीशक्ती शिवतीर्थ मैदान वाचवण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने वतीने स्वाक्षरी मोहीम

 

 

निगडी (कृष्णा नेपते) : पुणे शहरातील निगडी येथे असणा-या भक्तीशक्ती शिवतीर्थ मैदानावर महानगरपालिका प्रशासनामार्फत विक्री करण्याचा जो घाट बांधला आहे तो हाणून पाडण्यासाठी सामाजिक संघटना आक्रोश करत आहेत. हे मैदान वाचवण्यासाठी भक्तीशक्ती शिवजयंती उत्सव समिती व छावा मराठा युवा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवली होती त्याला शिवभक्तांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.


भक्ती शक्ती मैदान म्हणजे ऐतिहासिक व संत साहित्याचा वारकरी संप्रदायाचा एक उत्तम ठेवा आहे. कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरु तुकोबाराय यांची भेट झालेले हे ऐतिहासिक वारसा असलेले हेच शिवतीर्थ मैदान आहे. या मैदानावर जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पालखीचा विसावा असतो, विसाव्याची साक्ष देणा-या या भक्ती शक्ती शिवतीर्थ मैदानावर शहरातील सर्वात मोठी शिवजयंती साजरी होते. मात्र हे मैदान बळकावण्यासाठी मनपा प्रशासन आसुसले आहे. याला समाजातून तीव्र विरोध होताना दिसत आहे. हे शिवतीर्थ मैदान वाचवण्यासाठी भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती व छावा मराठा युवा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवली होती.

भक्ती शक्ती लगत असलेल्या शिवतीर्थ मैदानावर पीएमआरडीए ने प्लाॅटींग काढून विक्री केले आहेत, त्यावर तात्काळ स्थगिती आणून हे मैदानावर भव्यदिव्य शिवसृष्टी करून हे मैदान कायमस्वरूपी शिवजयंती साजरी करण्यासाठी मोकळे ठेवावे अशी मागणी भक्तीशक्ती शिवजयंती उत्सव समिती व छावा मराठा युवा महासंघ यांनी ही मागणी केली आहे.

भक्ती शक्ती शिवतीर्थ मैदान वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली तेव्हा शिवभक्तांनी हजेरी लावत स्वाक्षरीच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवत भक्तीशक्ती समूह शिल्प उद्यानामध्ये स्वच्छता गृह त्वरित उभारण्यासाठी स्वाक्षरी मोहीम केली.

Leave A Reply

Your email address will not be published.