वाडी गावाला कोणी ग्रामसेवक देता का गावक-यांची आर्त हाक

0 184

‎वाडी गावाला कोणी ग्रामसेवक देता का गावक-यांची आर्त हाक

 

खामगाव ( नंदकिशोर भारसाकळे) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी १८ तास काम करताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे तालुक्यातील वाडी गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाला केवळ आठ तास काम करणारा प्रशासकीय अधिकारी मिळत नसल्याने गावाच्या विकासाला खिळ बसली आहे.

आज महाराष्ट्र दिनी झेंडा वंदना वेळी वाडी गावाला ग्रामसेवक नसल्याचे गावातील काही सुजान नागरिकांच्या लक्षात आले असता पत्रकार नंदकिशोर भारसाकळे यांनी याविषयी गावचे प्रथम नागरिक विनोद मिरगे यांना ग्रामसेवक या पदाधिकारी यांचेविषयी चौकशी केली असता त्यांचे दिलेले उत्तर ऐकूण वाडीला ग्रामसेवक मिळणार की वाडी ग्रामपंचायत विना ग्रामसेवकाचा कार्यभार करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आठ दहा हजार लोकसंख्या असलेला वाडी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक येत नसल्याने हे गाव शासकीय सोयी सुविधांपासून कोसो दूर आहे. या गावात आजपर्यंत घरकुल योजनेंतर्गत एकाही ओबीसी कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात जिवाची बाजी लावत प्रशासकीय अधिकारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात मात्र वाडी गावचा ग्रामसेवक कुठे कर्तव्य बजावतो कुणास ठाऊक अशी लोकांमध्ये चर्चा आहे.

वाडी ग्रामस्थांना कुणी ग्रामसेवक देता का ? कारण या गावचा विकास खुंटला नव्हे तर टांगला आहे. त्यामुळे तालुका व जिल्हा प्रशासनाने या वाडी ग्रामपंचायतला तात्काळ ग्रामसेवक द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या मागणीकडे प्रशासन शासन केव्हा लक्षात देणार ? या गावासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा जेणेकरून शासन दरबारी गावाच्या समस्यांचा पाठपुरावा होऊन गावाचा विकास होईल अन्यथा देश विश्वगुरू होईल अन् वाडी तशीच राहील त्यामुळे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.