लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर अत्याचार – नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

0 9
लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर अत्याचार
– नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
परभणी : येथील एका २२ वर्षीय तरुणीला समाजमाध्यमावर झालेल्या एक ओळख झालेल्या युवकाने लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार  केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी युवकावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी अनिकेत अग्रवाल हा आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणीने आरोपीच्या घरी जाऊन गोंधळ घातल्या प्रकरणी तरुणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, एक वर्षापूर्वी वसमत रोडवरील एका कॉफी शॉपमध्ये तरुणीची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरु झाल्यानंतर  पीडितेला भेटण्यास बोलाविले. जून २०२३ मध्ये जिंतूर रोडवरील एका लॉजवर बोलावून तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत तसेच समत रोडवरील एका कॉफीशॉपमध्ये बळजबरीने अत्याचार करीत संबध ठेवले.
सदरील प्रकार जून २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्यासोबत लग्न करतो, असे म्हणत लग्नाचे अमिष दाखवून बळजबरीने अत्याचार करण्यात आला. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी अनिकेत अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडितीने २७ जानेवारी अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत तरुणाला मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार नानलपेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
कॉफीशॉपच्या आड अश्लिल प्रकार
परभणी शहरात कॉफीशॉपच्या आडमध्ये अश्लिल प्रकार होत आहेत. काही महिन्यापूर्वी देशमुख हॉटेल येथील प्रकार उघड केला होता. आता नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात घटनास्थळामध्ये लॉजबरोबर वसमत रोडवरील एका कॉफीशॉपचा देखील समावेश असल्याचे पुढे आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.