येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात ४ दलघमी पाण्याचा विसर्ग -जल विद्युत केंद्रातून १५ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू

0 21
येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात ४ दलघमी पाण्याचा विसर्ग
-जल विद्युत केंद्रातून १५ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू
परभणी : जिल्ह्यातील येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात वीजनिर्मितीच्या तीन संचांपैकी दोन संचांमधून ४ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने नांदेड, हिंगोली व परभणीतील ५८ हजार हेक्टरांवरील शेतकºयांच्या पिकांना पाणी मिळणार आहे. हे जल विद्युत केंद्र सुरू होऊन १५ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यासह परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील ५८ हजार हेक्टर शेतीचे सिंचन करणाºया सिद्धेश्वर धरणातून पुढील २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर दुसरीकडे १ फेब्रुवारीपासून पूर्णा कालव्यातून दुसरी पाणीपाळी सुरू करण्यात आली आहे. यासाठी पावसाळा वगळता उन्हाळा आणि हिवाळा या काळात पिण्याचे पाण्याचे नियोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात ६७ टक्के असलेले हे धरण महिन्याअखेर ३७ टक्केवर येऊन पोहोचले आहे. या धरणातून दररोज २  दशलक्ष घनमीटर एवढे पाणी दररोज खर्च केले जाते.
सिद्धेश्वर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग
येलदरी धरणात २० दिवसांपुरताच पाणीसाठा 
शिल्लक आहे. त्यामुळे धरणातून सिद्धेश्वर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. साधारणत: ५० ते ६० दशलक्ष घनमीटर इतके पाणी सिद्धेश्वर धरणामध्ये सोडले जाईल. त्यानुसार सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी ७० टक्के पर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय
जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या धरणातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय देखील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, कडा प्रशासकांनी घेतला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.