भीमशक्ती संघटनेचा भव्य सत्याग्रह मोर्चा – लेखी निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्या कडे मागणी

0 13

भीमशक्ती संघटनेचा भव्य सत्याग्रह मोर्चा
– लेखी निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्या कडे मागणी
धर्माबाद : तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भात माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे प्रणित भीमशक्ती संघटना तालुका शाखा धर्माबाद आता रस्त्यावर उतरणार असून विविध वास्तव मागण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी फुलेनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भव्य सत्याग्रह मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी लेखी निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यासह १८ शासन व प्रशासन कर्त्यांना देण्यात आलेले आहे.
सर्व बेघर अतिक्रमणधारक भूमिहीन कुटुंबांना सरसकट घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी एकूण बजेटच्या किमान ४० टक्के बजेट राखीव करावा, भूमीहीन बेघर भाडेकरूंना शासकीय जमिनीचे वाटप करावे व त्यांना मालकी द्यावी, गृहनिर्माण हमी कायदा करावा, गॅस सिलेंडरचे मूल्य सरसकट ४५० रुपये निर्धारित करावे, पेट्रोल डिझेलचे वरील उत्पादन शुल्क आणि वॅट ९० टक्के कमी करावे ,वीज आकारणी ७० टक्के कमी करावे या मागण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा फुलेनगर ते तहसील कार्यालय धमार्बाद पर्यंत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सत्याग्रह महामोचार्चे आयोजन करण्यात आले आहे. या मागण्याचे निवेदन धमार्बाद तहसीलदारां मार्फत शासन व प्रशासनास देताना धर्माबाद भीमशक्ती संघटनेचे कृतिशील तालुका अध्यक्ष शिवराज गायकवाड, शहराध्यक्ष अ‍ॅड सोनटक्के आर. व्ही, रामदास पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.