कंधारच्या व्यापारी संकुलाची लिलाव प्रकिया रद्द – मुख्‍याधिकारी यांच्या निर्णयाने व्यापाºयांना धक्का

0 22

कंधारच्या व्यापारी संकुलाची लिलाव प्रकिया रद्द
– मुख्‍याधिकारी यांच्या निर्णयाने व्यापाºयांना धक्का
कंधार : जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या पुढाकाराने कंधारच्या बाजारपेठेतील व्यापारी संकुलाची आॅनलाईन पध्‍दतीने लिलाव प्रक्रिया सुरु असतांना अचानक मुख्‍याधिकारी नगर परिषद कंधार यांनी सदरची प्रक्रिया रद्द केल्याने व्‍यापाºयांना धक्‍का दिला होता. ई लिलाव प्रक्रिया दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी रद्द केल्‍याचा आदेश काढला होता. या आदेशाला व्‍यापाºयांनी उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे रिट याचीका दाखल केली होती, सदर आदेशास दि.२९ जानेवारी २०२४ रोजी स्‍थगिती मिळवली आहे.
नांदेडचे तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी सन २०१२ मध्‍ये कंधार शहरातील ३०० ते ३५० दुकानांची मुख्‍य बाजारपेठ जेसीबी मशीनच्या माध्यमातून अतिक्रमणच्या नावाखाली उध्‍दवस्‍त करण्यात आली. तेंव्‍हापासून सन २०२२ पर्यंत हा विषय जागेअभावी रखडला होता. व्यापारी संकुलाची सदर प्रक्रिया रद्द करण्‍याच्‍या मुख्याधिकारी यांच्या आदेशाविरूध्‍द व्‍यापारी शेख नदीम शेख मगदुम यांच्‍यासह इतर व्‍यापाºयांनी उच्‍च न्‍यायालयाचे दार ठोठावून मुख्‍याधिकºयांच्‍या आदेशाला सध्या स्‍थगिती मिळवली आहे. यामुळे व्‍यापाºयांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. तत्‍कालीन उपविभागीय अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील यांनी पुढाकार घेवून कंधार नगर परिषदेस शासनामार्फत जिल्‍हा परिषदेची जागा हस्‍तांतरण करून दिली होती. यावेळी कंधार तालुक्‍याचे भुमिपूत्र तथा कंधार नगर परिषदेचे तत्‍कालीन मुख्‍याधिकारी विजय चव्‍हाण यांच्‍या पुढाकाराने नविन व्यापारी संकुल बांधकाम करण्‍याचे काम हाती घेण्‍यात आले व त्‍यास यशही मिळाले. इमारत बांधकाम पूर्ण होवून जवळपास एक वर्ष झाले आहे, व्‍यापााºयांना दुकाने कसे वाटप करावे याचा ताळमेळ लागत नव्‍हता. यामध्ये नांदेडचे जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्र‍त्‍यक्ष व्यापारी संकुलाची पहाणी करून लिलाव प्रक्रिया आॅनलाईन पध्‍दतीने करण्‍याची घोषणा केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.