मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरली तरच पगार – प्रशासक जी. श्रीकांत यांचे अधिकारी कर्मचाºयांना आदेश

0 22

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरली तरच पगार
– प्रशासक जी. श्रीकांत यांचे अधिकारी कर्मचाºयांना आदेश
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी काढलेल्या परिपत्रकातून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरली तरच फेब्रुवारीचा पगार केला जाईल, त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत कर भरल्याची पावती लेखा विभागात सादर करा असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता अधिकारी-कर्मचाºयांना नियमित आणि थकीत मालमत्ता कर भरावा लागणार आहे.
महापालिकेने यंदा मालमत्ता कर वसुलीसाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय करवसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात ३५० कोटी रुपयांचे तर पाणीपट्टी वसुलीसाठी १३० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट ठेवले आहे. कर वसुल करणाºया कर्मचाºयांना सुद्धा रोजच्या कर वसुलीचे उद्दीष्ट नेमून देण्यात आले आहे. आतापर्यंत कर वसुलीच्या माध्यमातून ११८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मार्च अखेरीस जास्तीत जास्त कर वसुली झाली पाहिजे याचे नियोजन केले आहे. बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून काही मालमत्ता सील करून त्याचा लिलाव करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.
कर भरल्याची पावती जमा करा
पालिकेत कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांनी देखील मालमत्ता कर, पाणीपट्टी भरलीच पाहिजे या हेतूने प्रशासकांनी परिपत्रक काढले असून कर भरला तरच फेब्रुवारी महिन्याचा पगार केला जाईल. कर भरल्याची पावती १५ फेब्रुवारीपर्यंत लेखा विभागात जमा करा असे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.