बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा सहभाग -गुवाहाटी व्हाया सूरत नाटकात असल्याची उदय सामंत यांची कबूली

0 22
बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा सहभाग
-गुवाहाटी व्हाया सूरत नाटकात असल्याची उदय सामंत यांची कबूली
बीड : बारामती ते मंत्रालय नाटकात धनंजय मुंडेंचा सहभाग होता. तर मुंबई, गुवाहाटी व्हाया सूरत नाटकात मी होतो. मी पुन्हा येईन नाटकदेखील आधी रचलं गेलं होतं,  असं उद्योगपती उदय सामंत म्हणाले. १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन धनंजय मुंडेंच्या हस्ते झालं. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी उदय सामंत होते.
यावेळी ते म्हटले की,कलाकार तीन तास मेकअप करतात. पण आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप करतो,उदय सामंत यांनी धनंजय मुंडेंचं तोंडभरुन कौतुक करताना, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एखाद्याला ताकद कशी दिली पाहिजे ते मी मुंडेंकडून शिकलो. मतभेद असूनही कलाकार सगळं काही विसरुन नाटकात काम करण्यासाठी पुढे येतात. त्यांचा आदर्श राजकारणी लोकांनी घ्यायला हवं, असं सामंत म्हणाले. यावेळी  आयुष्यात अनेक कार्यक्रम केले, असंख्य नाटकं पाहिली. आयुष्यात आलेली अनेक नाटकं भोगली. पण विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन करण्याची संधी जीवनात पहिल्यांदाच मिळाली, अशा शब्दांत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.
धनंजय मुंडेंकडून प्रशांत दामले यांचे कौतुक
गेल्या २५ वर्षांपासून प्रशांत दामले यांना पाहतोय. त्यांच्या चेहºयात जराही फरक पडलेला नाही. त्यांच्या नावातच शांत शब्द आहे. प्रयोग करताना जे कधीच नाही दमले, असे हे दामले असे म्हणत धनंजय मुंडेंनी त्यांच्या भाषणात प्रशांत दामलेंचं कौतुक केलं.
Leave A Reply

Your email address will not be published.