राजीनामा देऊन उपकार केले नाही – मनोज जरांगे यांच्याकडून छगन भुजबळांचा समाचार

0 11
राजीनामा देऊन उपकार केले नाही
– मनोज जरांगे यांच्याकडून छगन भुजबळांचा समाचार
जालना : १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन आंबडच्या सभेला गेलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याची वाच्यता नको असे सांगितल्याने मी अडीच महिने शांत राहिलो, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, अन्यथा समुद्रात जा, आम्हाला काही देणंघेणं नाही, असे म्हणत त्यांनी भुजबळांनी राजीनामा देऊन उपकार केले नाही असा टोला लगावला.
यावेळो बोलतांना जरांगे म्हणाले की, एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठल्या सारखं बोलत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचा भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. ज्या पक्षात जाणार त्यांना अडचणीत आणण्याची भुजबळ यांची सवय आहेत. भुजबळ कोणत्या पक्षात जावे आम्हाला काही देणघेणे नाही. राजीनामा दिला तर आम्हाला काय करायचे असे
मनोज जरांगे म्हणाले.
शेरशायरी करून भुजबळ तीन-तीन रुपये जमा करणार का?
मनोज जरांगे यांनी बोलताना म्हटले की, राजीनामा द्यावा अन्यथा काही करो आम्हाला काहीच देणघेण नाही. राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, राजीनामा देऊन उपकार केले नाही. शेरशायरी करणारे भुजबळ दुकान टाकून तीन-तीन रुपये जमा करणार का? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
Leave A Reply

Your email address will not be published.