माझी स्मार्ट सिटी बसमध्ये स्मार्ट घोटाळा – झिरो तिकीट प्रकरणी १७ वाहकांवर कारवाई

0 32
माझी स्मार्ट सिटी बसमध्ये स्मार्ट घोटाळा
– झिरो तिकीट प्रकरणी १७ वाहकांवर कारवाई
छत्रपती संभाजीनगर : माझी स्मार्ट सिटी बसमध्ये काही वाहकांनी स्मार्ट घोटाळा केला आहे. झिरो तिकीट या नावाने हा घोटाळा उघडकीस आला असून घोटाळा करणाºया १७ वाहकांना नारळ देण्यात आला आहे. या घोटाळ्यात आणखीन वाहक असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घोटाळ्यामुळे माझी स्मार्ट बस ला दीड ते दोन लाख रुपयांच्या महसूलाला मुकावे लागले आहे.
शहराची सार्वजनिक वाहतुक सुरूळीत करण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली. माझी स्मार्ट बस या नावाने ही बस सेवा ओळखली जात आहे. या सेवेने नुकतेच पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या पदार्पणाच्या काळातच स्मार्ट सिटीच्या सिटी बस विभागात झिरो तिकीट घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्याबद्दल दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे.
सिटी बसच्या काही वाहकांनी प्रवाशांना झिरो तिकीट दिले. म्हणजे प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे तर घेतले; पण त्यांना तिकीट दिले नाही. प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकना इलेक्ट्रॉनिक मशीन देण्यात आले आहे. मशिनमध्ये प्रत्येक तिकीटाची नोंद होते. वाहकांच्या माध्यमातून तिकिटांचा घोळ सुरू असल्याची खबर भरारी पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने तपासणी सुरू केली. तिकीट मशिनच्या सिस्टीमवर जाऊन झिरो तिकीटची तपासणी करण्यात आली. तेव्हा सुरुवातीला ६० ते ७० हजार रुपयांचा घोटाळा समोर आला. याची गंभीर दखल घेऊन ज्या मशिनच्या माध्यमातून हा घोटाळा उघड झाला ते मशीन हाताळणाºया वाहकांची पडताळणी करण्यात आली आणि त्यांना सेवेतून कमी करण्यात आली.
१७ वाहकांवर कारवाई
झिरो तिकीट घोटाळ्याप्रकरणी सेवेतून कमी करण्यात आलेल्या वाहकांची संख्या १७ वर पोहोचली आहे. या कारवाईला सिटी बस विभागाचे मुख्य चालन अधिकारी संजय सुपेकर यांनीदेखील दुजोरा दिला. प्रशासकांना या बद्दल अहवाल सादर करणार असल्याचे ते म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.