सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दाम  – पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवाल दिल

0 22
सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दाम 
– पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवाल दिल
बीड : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. मात्र, या वर्षी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे. सिोयाबीनला यंदा सरकारने चार हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. बाजार समितीत शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ आली असल्याने शेतकºयांच्या चिंतेत भर पडला आहे.
बीड बाजार समितीत बुधवारी सोयाबीनची सुमारे ११५ क्विंटल आवक झाली. मात्र बीड बाजार समितीत शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ ओढावली. सोयाबीनचा किमान भाव चार हजार ३९० रुपये, तर कमाल भाव चार हजार ४५१ रुपये, तक सरासरी दर चार हजार ४३४ रुपये मिळाला असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
एडीएम कंपनीने भाव कमी झाल्याने बीड जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्रे बंद केली आहेत. त्यामुळे आडत दुकानदारांनी बाजार भाव आणखी कमी केला आहे. त्याचा फटका शेतकºयांना बसत असून, शेतकºयांच्या पदरात फक्त चार हजार ३०० रुपये पडत आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकºयांची लूट होत असल्याचे शेतकरी महादेव निर्मळ यांनी सांगितले.
सोयाबीन विकून हातात काहीच पडले नाही
खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्च एक हजार रुपये. यासोबतच प्रत्येक पोत्याला दहा रुपये हमाली घेतली जात आहे. त्यामुळे शेतकºयांना सोयाबीन विकून हातात काहीच पडत नसल्याचे पिंपळगाव येथील शेतकरी तुकाराम सीताराम घोळवे यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.