राजस्थानी मल्टीस्टेट व पतसंस्थेच्या अध्यक्ष संचालक मंडळाचे पासपोर्ट व खाजगी मालमत्ता जप्त करून ठेविदारांचे पैसे द्यावे : देवराव लुगडे महाराज

0 17

राजस्थानी मल्टीस्टेट व पतसंस्थेच्या अध्यक्ष संचालक मंडळाचे पासपोर्ट व खाजगी मालमत्ता जप्त करून ठेविदारांचे पैसे द्यावे : देवराव लुगडे महाराज

परळी (वार्ताहर) : राजस्थानी मल्टीस्टेट व नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची खाजगी मालमत्ता व पासपोर्ट जप्त करून ठेवीदारांचे पैसे तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केली असून मागच्या चार महिन्यापासून राजस्थानी मल्टीस्टेट व नागरी पतसंस्थेच्या ग्राहकांचे पैसे मिळत नाहीत. ग्राहकांनी वारंवार या विरोधात पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळांना विनवणी केली पण फक्त आश्वासन मिळत आहेत. मागच्या महिन्यामध्ये बीड जिल्हाधिकारी यांना पतसंस्थेच्या वतीने लेखी आश्वासन दिले की 2 फेब्रुवारीला आम्ही ग्राहकांचे वाटप सुरू करू पण हे वाटप सुरू केले नाही. या सगळ्या विरोधात ठेवीदारांनी परळी तहसील कार्यालयावर मागच्या तीन दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने याची कसलीही दखल घेतली नसून या आंदोलनाची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही ग्राहक ठेवीदारांसह रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.