अकार्यक्षम संचालक मंडळ बरखास्त करा – शिक्षणाधिकारी यांचेकडे योगेश साखरे यांची निवेदनाद्वारे मागणी

0 40

अकार्यक्षम संचालक मंडळ बरखास्त करा

– शिक्षणाधिकारी यांचेकडे योगेश साखरे यांची निवेदनाद्वारे मागणी

धारूर (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल शिक्षण संस्था, अंजनडोह या संस्थेत मागील काही दिवसापूर्वी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली होती. त्याप्रमाणे ०५ फेब्रुवारी रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या.परंतू संस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे मुलाखती रद्द कराव्या लागल्या.मुलाखती रद्द का करण्यात आल्या असा प्रश्न विचारल्यास संस्थेकडून उमेदवारांना उडवावूडवीचे उत्तर देण्यात आले.

सदरील जागा अगोदरच निश्चित करून फॉरम्यालिटी म्हणून जाहिरात दिली जाते असा आरोप जाणसामान्य जनता करत आहे. हा आरोप खरा असेल तर जाहिरात देऊन शेकडो किलोमीटरहुन येणाऱ्या उमेदवारचा वेळ आणि पैसा का नासवला जातो असा प्रश्न पडतो.संस्थेत कुठल्याही प्रकारच्या जागा भरण्यावेळी असाच गोंधळ होत असतो,आणि त्याचा त्रास गोरगरिबांच्या लेकरांना होतो.संस्थेत कालही तोच प्रकार घडला.

माझी स्पष्ट भूमिका आहे सदरील जागा ह्या गुणवंत्तेच्या आधारावर भरल्या गेल्या पाहिजेत,मुलाखतीला आलेल्या उमेदवारांना झालेला आर्थिक बुर्दंड संस्थेकडून वसुल करण्यात आला पाहिजे,अकार्यक्षम संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासन नेमन्यात यावे यासाठी काल शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.