बागेश्वरनंतर आता बिहारमध्ये ब्लँकेट बाबा -बक्समध्ये दरबाराचे आयोजन

0 22

बागेश्वरनंतर आता बिहारमध्ये ब्लँकेट बाबा
-बक्समध्ये दरबाराचे आयोजन

 

पाटणा : बागेश्वर धामचा आचार्य धीरेंद्र शास्त्री यांचा दराबार उभारल्यानंतर बक्सरमध्ये आता कंबलवाले बाबांचे शिबीर सुरू झाले आहे़ या शिबीराद्वारे आजारी असलेल्या लोकांना लाभ होत असल्याचे सांगितले जात आहे़ या शिबीरात केवळ काही सेकंदात आजार बरे केले जात असल्याची चर्चा सुरू आहे़ यामुळे ब्लँकेट बाबाच्या दरबारात गर्दी होताना दिसत आहे़
बक्समधील पिप्रध गावात सुरू असलेल्या चार्तुमास यज्ञादरम्यान लक्ष्मी नारायण त्रिदंडी स्वामी गंगापुत्र यांच्या विनंतीवरून ब्लँकेट बाबांच्या एक दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी या बाबाने आपल्या डोक्यावर काळे कमळ बांधून पिप्रध गावात आगमन केले होते़आपल्या कंबलमुळे क्षणात आजार बरे होत असल्याचे सांगणाºया या बाबाकडून आजारावर उपचार घेण्यासाठी शुक्रवार रोजी बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील लोकांनी गर्दी केली होती़
ब्लँकेट बाबा आपल्या शिबीरातून दावा करतो की, त्यांच्या ब्लँकेटच्या जादूने ते अर्धांगवायू, पोलिओ, कर्करोग, बीपी, शुगर या रोगांसह अनेक रोग बरे करत असल्याचा दावा करतात़ यावेळी या बाबाने आपले खरे नाव गणेश गुर्जर असल्याचेही सांगितले़ आपल्याला वयाच्या १४ व्या वर्षी देवीचा आशिर्वाद म्हणून ही घोंगडी मिळाली़ त्यामुळे मी ब्लँकेट बाबा या नावाने प्रसिध्द असून जिथे विज्ञान संपते तिथे आधात्म सुरू होते, असा दावा ही या ब्लँकेटवाल्या बाबाने केला़

 

Leave A Reply

Your email address will not be published.