शनिदेवाचे दर्शन घेऊन जाणाºया दोघांचा मृत्यू – अ‍ॅटोच्या अपघातात पाच जण जखमी

0 20

शनिदेवाचे दर्शन घेऊन जाणाºया दोघांचा मृत्यू
– अ‍ॅटोच्या अपघातात पाच जण जखमी

फरीदाबाद : हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील एक कुटुंब शनिदेवाचे दर्शन घेऊन अ‍ॅटोने आपल्या गावी परत जात होते़ यावेळी राष्ट्रीय महामार्गावर शनिवार दि़ २ सप्टेंबर रोजी या अ‍ॅटोचा अपघात झाला़ यात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फरीदाबादमधील हे कुटुंब शनिदेवाचे दर्शन घेऊन राष्ट्रीय महामार्गावरून अ‍ॅटोने गावाकडे जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला अ‍ॅटोची जोरदार धडक बसल्याचे गावकरी सांगतात़ हा अपघात येवढा जोरात होता की, अ‍ॅटोमधील आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला तर अ‍ॅटोतील बाकी पाच जण जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी फारीदाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले़ या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़

 

Leave A Reply

Your email address will not be published.