मुख्यमंत्री पटनायक यांच्या खासगी सचिवावर शाईफेक -जिल्हाधिकारी वर्मा यांच्यावरही शाईफेक

0 19

मुख्यमंत्री पटनायक यांच्या खासगी सचिवावर शाईफेक
-जिल्हाधिकारी वर्मा यांच्यावरही शाईफेक

 

भुवनेश्वर : ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खासगी सचिव व्ही़ के़ पांडियन व पुरीचे जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे़ ते पुरी जिल्ह्यातील सत्यबारी येथील एका महाविद्यालयात बैठकीसाठी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला़ हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमागचे कारण अद्याप समजले नाही़
२००० च्या बॅचचे आयएएस अधिकारी व्हीक़े़ पांडियन व जिल्हाधिकारी समर्थ शर्मा हे सत्याबादी भागातील गोपबंधु स्मृती महाविद्यालयात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते़ यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला झाला़ या हल्लेखोरांकडून दोघांच्याही तोेंडावर शाईफेक करण्यात आली़ शाई फेकणाºया व्यक्तीचे नाव भास्कर साहू, कानस पुरी असून त्याला पोलिसांनी अटक केले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शाईफेक करणारा व्यक्तीला अटक करण्यात आले असून शाईफेक करण्यामागचे कारण अद्याप समजले नसल्याचे सांगण्यात येत आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.