१०० वर्षांतील पहिला कोरडा आॅगस्ट -अल निनोची भिती, ताप वाढणार

0 26

१०० वर्षांतील पहिला कोरडा आॅगस्ट
-अल निनोची भिती, ताप वाढणार

 

नवी दिल्ली : भारतात अल निनोचा प्रभाव जुलैमध्ये कमी झाला असला तरी याचा आॅगस्टमध्ये मान्सूनवर परिणाम झाला आहे़ यावर्षीचा आॅगस्ट हा मागील १०० वर्षांमधील पहिलाच कोरडा आॅगस्ट आहे़ यावर्षीचे पावसाचे सर्व अंदाज फेल ठरले आहेत़ या महिन्यांत सामान्यापेक्षा ३६ टक्के कमी पाऊस झाला आहे़
देशात यावर्षीच्या आॅगस्टमध्ये केवळ १६१़७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ १९०१ नंतर पहिल्यांदाच आॅगस्ट महीना कोरडा गेला आहे़ यापुर्वी २००५ मध्ये आॅगस्ट मध्ये सरासरीपेक्षा २५ टक्के कमी आणि १९६५ च्या तुलनेत २४़६ टक्के कमी पाऊस झाला़ हवामान खात्याच्या आकडेवारीनूसार २००९ मध्ये सामान्यापेक्षा २४़१ टक्के कमी पाऊस पडला होता़ १९०१ नंतरचा हा सर्वात कोरडा आॅगस्ट आहे़ यावर्षीचा आॅगस्ट हा आतापर्यंतचा सर्वात कोरडा आॅगस्ट असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे़
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आॅगस्टमध्ये सर्वात कमी म्हणजे १९० मिमी पाऊस पडला होता़ परंतू यावेळी हा आकडा केवळ १६० मिमी असा आहे़ आॅगस्टमध्ये सरासरी २५५ मिमी पाऊस पडत असतो, जो वार्षिक पावसाच्या सुमारे २२ टक्के आहे़ याविषयी आएमडीचे प्रमुख मृत्यूंजय महामात्रा म्हणतात की, एल निनो हे आॅगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचे मुख्य कारण आहे़
अल निनोमुळे पाऊस कमी
पॅसिफिक प्रदेशात वाहणारे व्यापारी वारे अल निनो प्रभावामुळे कमकुवत असतात़ हे वारे आर्द्रतेने भरलेल्या मान्सून वाºयांशी संबंधित आहेत़ यामुळे मान्सूनचा वेग कमी होतो, ज्यामुळे भारतीय उपखंडात पाऊस कमी पडतो, असे आएमडीचे प्रमुख मृत्यूंजय महामात्रा म्हणाले़

Leave A Reply

Your email address will not be published.