नागपुरात मनोहर कुलकर्णीला वंचित बहुजन आघाडीकडून घेराव घालण्याचा प्रयत्न

0 232

नागपुरात मनोहर कुलकर्णीला वंचित बहुजन आघाडीकडून घेराव घालण्याचा प्रयत्न

– आंदोलकांकडून संविधान विरोधी भिडे मुर्दाबादच्या घोषणा

 

नागपूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख मनोहर कुलकर्णी हे नेहमी वादग्रस्त व बालीस वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. यामुळे नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावल्याचे सांगण्यात येत आहे.


मनोहर कुलकर्णी हे नागपुरात एका कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी जात असताना अचानक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत ‘संविधान विरोधी संभाजी भिडे मुर्दाबाद’ अशा घोषणा देत मनोहर कुलकर्णी ज्या गाडी बसले होते, ती आडवण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते कार्यक्रम स्थळाकडे गेले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संविधान विरोध संभाजी भिडे मुर्दाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडत सरकार हम सें डरती हैं पुलिस को आगे करती है म्हणत सरकारचाही निषेध केला. यावेळी पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांसह महीलांनाही अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

यापुर्वी मनोहर कुलकर्णी यांच्या मुंबई येथील कार्यालयावर बंदी घाला म्हणून पुरोगामी संघटनांच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदन दिले होते. मात्र पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर मनोहर कुलकर्णी यांची कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न मागील आठवड्यात मुंबई मध्ये झाला होता.

 

३१ जुलै रोजी मनोहर कुलकर्णी हे खामगाव शहरात येणार आहेत, यामुळे कुलकर्णींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये यासाठी खामगावमधील पुरोगामी संघटनांनी आज दि. २७ जुलै रोजी पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.