बहुत मातले राऊळात नंदी ! करी जायबंदी भावीकांशी !.

0 614
बहुत मातले राऊळात नंदी ! करी जायबंदी भावीकांशी !.

 

रेपे नवनाथ दत्तात्रय
भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक.
मो. 9762636662

 

‘चालाख ब्राम्हणा डोहाळे लागले ! तेने हळजिले देव सारे !
तेहतीस कोटी गायीच्या पोटात ! बैलाच्या चोटात मात्र नाही !
श्वानाच्याही अंगे म्हणे खंडेराव ! अडकुनी गाव फिरू लागे !
म्हणे विश्वंभर देव कोणा ठावे ! तरी येडझवे पुजीताती !
वरील अभंग विश्वंभर वराट यांच्या बिजेचे अभंग या पुस्तकातील असून ते आज पुर्णपणे लागू पडतात. कारण की, संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा. एम.एम. लिहितकर म्हणतात की, ‘भारतात सामाजिक शहाणपणाचा अभाव आहे. ज्या देशात प्रज्ञेला साक्ष ठेवून पुराव्यानिशी लिहणे, बोलणे गुन्हा ठरतो त्या देशातील जनसमुहाची वैचारिक बैठक, आवडीनिवडी, आचारविचार, आपसातील व्यवहार लक्षात घेता असे म्हणावे लागेल की, हा बहुसंख्य मनोरुग्णांचा देश आहे. अंधश्रद्धांनी सर्वसामान्यांचे तर सोडा पण तथाकथित उच्चविद्या विभुषित बुद्धीवंतांनासुध्दा अर्धांगवायू झाला आहे’.आज लिहीतकर याचें हे वाक्य आज तंतोतंत लागू पडते कारण यापुर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या हाताने गणपती दुध पिला होता. पिलाही असेल कारण त्याला पाणी आवडत नसेल ?म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
विश्वांभर वराट
पशुचे मुंडके मेंदूही पशुचा ! गणेश बुध्दीचा देव कैसा !
याशी पुजताना मज येते हसू ! आहे नरपशू गणपती !
सोंडेचा गणोबा इंद्रांचे प्रतिक ! इंद्र नालायक पूज्य नाही !
वहान उंदीर प्रिय गणेशाचे ! परि कृषकाचे दुष्मण ते !.
आजपर्यत कृष्णाच्या व गणपतीच्या मुर्तीन दुध पिल हे ऐकल होत पण काल परवा चक्क मंदीरातील नंदीन दूध प्राशन केल अशी बातमी वा-याच्या वेगाने पसरली. मग काय भक्त लगेच दुधाचे लोटे घेऊन थेट नंदीच्या पुढेच गेले आणि नंदीला दुध पाजू लागले. भक्तांच्या हातचं नंदी दुध पितो की नाही ?हे त्यांनाच माहीत. पण नंदीप्रकरणावरून मनात प्रश्नाच काहुर माजल कारण नंदी दूध पितो तर मग चारा का खात नाही ?उद्या जर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे जर म्हणाले की, चारा घोटाळा झालाच नाही, तो चारा माझ्या अधिका-यांच्या हाताने नंदीला चारला असून तो त्यांने माझ्या डोळ्यादेखत खाल्ला खाल्ला आहे अस म्हटल्यास भक्ताड पिलावळ मान्य करेल का ?.दूध पिणारा नंदी चारा खात असेल तर तो पाणी पिईल का ? नंदीला दुध कोणत आवडत अमुल, गोकुळ की चितळे डेअरीच ? म्हणून तर विश्वाभंर वराट म्हणतात की, बहुत मातले राऊळात नंदी ! करी जायबंदी भावीकांशी !.
यापुर्वी देशात अनेक ठिकाणी श्रीकृष्णाची मुर्ती दूध पिल्याची अफवा पसरली होती. तर आता चक्क नंदी दुध पिल्याची अपवा पसरली पण भक्तांना अफवा काय असते ते काय माहीत ते कशाला काही पाजतील त्याचा काही नेम नाही. कारण काही वर्षांपूर्वी गणपती दूध पित असल्याची अफवा राज्यात पसरली होती. त्याचीच आठवण करून देणारी महादेवाच्या मंदिरातील नंदीची मूर्ती दूध पित असल्याची अफवा शनिवारी उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथे मुंजोबा मंदिरातून उठली. मंदीरात एक महीला पूजा करताना महादेवाच्या पिंडीसोबत असलेला नंदी तिच्या हाताने दूध पित असल्याची अफवा पसरली. ते पाहण्यासाठी भाविकांनी धाव घेतली. त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी आणि शिर्डी परिसरातही ही अफवा पसरली. त्यामुळे इतरही ठिकाणी ही घटना कळाली आणि त्यानंतर भाविक मंदिरात जाऊन नंदीच्या मूर्तीसमोर दूध धरून पाहून लागले. रात्री उशिरापर्यंत नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाविक असा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. तेव्हा खास विद्रोही कवी विश्वांभर वराटांच्या शब्दात सागांव वाटत की,
‘कसा सुधारेल पाषाणी माणूस ! देवच पाषाण आहे ज्यांचा !
श्वानाची शेपटी नळीत घातली ! नळीच वाकली होते ऐसे !’.
तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील आमखेडा आणि सोयगाव येथिल महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दूध पित असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच ग्रामीण भागातील महिलांची मंदीराकडे मोठी गर्दी उसळली. त्या महिलांनी दुध, पाणी घेवून मंदिर परिसर गाठला व महिलांच्या हाताने नंदीच्या मूर्तीला दुध आणि पाणी देण्यात आले. त्यातही काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाच्या नंदीला दुध आणि पाणी वर्ज केले त्यात काहींनी तर आमच्या हाताने नंदीने दुध पिल्याचे सांगितल्याने आणखीनच भर पडली होती. या गर्दीला आवर घालण्यासाठी अखेरीस सोयगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले. मात्र, अखेर ही अफवा असल्याचे समोर आले. त्यामुळे तर विश्वंभर वराट वेळोवेळी म्हणतात की,
विवेक बुध्दीचा न करी वापर ! पूजती खापर रात्रंदिन !
होऊनिया कष्टी म्हणे विश्वांभर ! माणसे की ढोरं समजेना !.
केवळ एका अफवेमुळे महादेवाच्या मंदिरावर रात्री उशिरापर्यंत महिलांची गर्दी उसळल्याचे पहावयास मिळाले. मात्र, ही अफवा असल्याचे आणि काही महिलांना नंदीने दुध सेवन केल्याच्या आनंदाने त्यांना स्वर्ग दोन बोटे राहिला होता. (लोकमत ०५ मार्च २२) पण अंनिसच्या  कृष्णा चांदगुडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की,.नंदी दूध पितो, अशा प्रकारचा चमत्कार घडत असल्याची अफवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पसरत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओही प्रसारित होत आहेत. खरंतर चमत्कार कधीही घडत नसतात. अशा घटनांच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम, हातचलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टी असतात. म्हणून नंदी दूध पितो, ही सुद्धा अफवाच आहे. या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे. अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे. म्हणून भाविकांनी आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच दुसरीकडे, अंनिसच्या राज्य सचिव व बुवाबाजी संघर्ष समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. रंजना गवांदे यांनी नगर जिल्ह्यातील घटनांबद्दल सांगितलं की, ‘बेलापूर येथील नंदीची मूर्ती बरीच जुनी आहे. ती सच्छिद्र असल्याचं सोशल मीडियावरील व्हिडिओतून दिसते. सच्छिद्र दगड पाणी, दूध शोषून घेतो, ऊन, वारा यामुळे मूर्ती जीर्ण होते. त्यामुळे द्रवरूप पदार्थ काही प्रमाणत शोषला जात असल्याने मूर्ती दूध पित असल्याची अफवा पसरली असावी,’ असं अॅड. गवांदे यांनी सांगितलं आहे. (मटा ०६ मार्च २२) अॅड. गवांदे यांना सांगाव वाटत की, तुम्ही जे वैज्ञानिक सत्य सांगितले ते या भक्तांच्या अकले बाहेरचे आहे म्हणून तर सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायधीश मा. काटजु हे एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, भारत हा नव्वद टक्के मुर्खांचा देश आहे. म्हणून थेट भक्तांच्या देवालाच भांडताना विश्वांभर वराट म्हणतात की,
ऐसाकैसा तू रे संकटमोचन ! शेपूट घालून बैसलाशी !
कोरोनाशी केले आम्ही दोन हात ! कळाली औकात देवा तुझी !.
कोरोना काळात एकीकडे संघाचे नंदी बैल गोबर भक्षक करून गोमुत्राचे घोट घेत होते. तसेच आज दुसरीकडे अंधश्रध्दाळू महीला दगडी नंदीला दूध पाजताना दिसल्या. ज्या महीलांनी नंदीला दुध पाजल किंवा पाजण्यासाठी धडपडत होत्या त्यांचा घरचा नंदी गोबर भक्षण करून गोमुत्राचे घोट घेतोय याच्याकडे थोडस लक्ष देऊन त्यालाही थोडस दूध पाजाव. कारण महीलांना आणि भक्तांना सांगाव वाटत की, तुमच्यापेक्षा त्या दगडी नदील समजल काय प्याव आणि काय पिऊ नये ?तर मग महीलांनो तुमच्या घरच्या नंदीला का समजत नसेल ?तुम्ही दगडी नंदीला जे दुध बळजबरीने पाजता ते दूध घरच्या नंदीला पाजून तुम्हीही थोडस प्राशन करा. म्हणजे तुमच्या डोक्यात जो आंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा जो किडा वळवळतोय तो थोडासा शांत बसेल, नाहीतर सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन जेष्ठ वकील, अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत अँड. नाना पालखीवाला त्यांच्या ‘वुई द पिपल…’ या ग्रंथात म्हणतात की, भारत हा मनोरूग्णांचा देश आहे. हे नाना पालखीवाला यांचे मत काय खोटे आहे ?.म्हणून तर विश्वाभंर वराट म्हणतात की,
सजीव माणसे मूर्तीशी बोलती ! काय हेपलीती हीतगुज !
म्हणे विश्वांभर जग वीपरीत ! मुर्ती आणि प्रेत समजेना !.
देव धर्म मुर्ती झेंडे यात गुंतलेल्या बहुजन समाजाला सांगाव वाटत यात अडकून पडू नका कारण कोणताही देव किंवा कोणतीही मुर्ती तुमचा उध्दार करणार नाही. तुमचे भले केवळ आणि केवळ शिक्षणातच आहे. म्हणून तर शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे अस डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत हे लक्षात घ्या. पण आमची लोक खुप खुप शिकली पण ते शेवटी धोंड्यात जमा झाली आहेत कालच्या नंदी प्रकरणावरून पुन्हा एकदा सिध्द झाल म्हणून तर विश्वाभंर वराट म्हणतात की,
‘श्वानालाही कळे देव हा दगडी ! उचली टंगडी मुते वरी !
हागती पाखरे रोज डोईवरी ! माणसाला तरी जाण नाही !
हाड म्हणताची कुत्रे टाकी हाड ! माणसाची ओड पाषाणाशी !
म्हणे विश्वांभर तुम्हा जे सांगतो ! अनुभव घेतो स्वये आधी !’
(सदरील लेख बामसेफचे मुखपृष्ठ ‘दैनिक मुलनिवासी नायक’ मध्ये दि. १६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.)
Leave A Reply

Your email address will not be published.