मनोहर कुलकर्णी यांच्या कार्यक्रम रद्द करा, पुरोगामी संघटनांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

0 146

मनोहर कुलकर्णी यांच्या कार्यक्रम रद्द करा, पुरोगामी संघटनांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

 

खामगाव (नंदकिशोर भारसाकळे): मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी ३१ जुलै २०२३ रोजी होऊ घातलेल्या कार्यक्राची परवानगी रद्द करावी या मागणीसाठी खामगाव,जि.बुलढाणा येथील सर्व पुरोगामी संघटना,बहुजनवादी संघटना यांच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव यांना निवेदन देण्यात आले.

हा कार्यक्रम खामगावात जर झाला तर या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या उद्देशाने सर्व बहुजन व पुरोगामी संघटनांनी पुढाकार घेतला.
हे निवेदन देण्यासाठी माळी समाज संघटना अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सातव, हरिभक्त परायण देवेंद्र झांबरे महाराज, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष पंजाबराव दादा देशमुख,धनगर समाज संघटना अध्यक्ष अशोकराव हटकर,राजपूत समाज संघटना अध्यक्ष तेजेन्द्र सिंग दादा चव्हाण,आदिवासी समाज संघटना अध्यक्ष महेंद्रसिंग राठोड,मंगेश भाऊ भारसाकडे कुणबी समाज युवा मंच महाराष्ट्र राज्य,जितेंद्र दादा चोपडे अध्यक्ष भाकप,प्रकाश भाई धुंधळे जिल्हा अध्यक्ष पॅंथर सेना,संदीप भाऊ देशमुख अध्यक्ष एन आय सी यु अशा विविध पुरोगामी व बहुजनवादी संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.