विरोधांकडून राज्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न

0 86

विरोधांकडून राज्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न

ममता बॅनर्जी यांचा विरोधकावर निशाणा

 

कलकत्ता : पश्चिम बंगाल राज्यात ८ जूलै रोजी पंचायतच्या निवडणूका होणार असून या निवडणुकीचे अर्ज दाखल करताना हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटना विरोधकांनी केल्या असून राज्याची प्रतीमा डागाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

महेशताला येथिल पक्ष कार्यालयात त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी ज्या कार्यकत्यांचे काम समाधानकारक नाही अशांना तिकीट नाकारल्याचेही सांगितले. निवडणूकीचा अर्ज दाखल करतेवेळी विरोधकांकडून हिंसाचार घडवला जात असून राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपने राज्याचा थकित निधी थांबवला असून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत टीएमसीच्या नेत्यांना धमकावण्याचा ते प्रयत्न करत आहेत असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली.

पोलिसांकडून सुरक्षेची खबरदारी

मंगळवारी सेक्युलर फ्रंट व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाल्यानंतर तिथे बॉम्ब फोडण्याचा प्रकार समोर आला तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली. सुरक्षेसाठी पोलिसांकडून फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हिंसाचाराच्या घटनेत अनेकांचा मृत्यू

पश्चिम बंगाल मध्ये यापुर्वी हिंसाचाराच्या घटना पंचायत निवडणूकीत घडल्या असून २०१३ मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत ३९ तर सन २०१८ मध्ये २१ लोकांचा मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.