उच्च न्यायालयात फिर्यादीनी प्राशने केले फिनाईल

0 22

उच्च न्यायालयात फिर्यादीनी प्राशने केले फिनाईल

गुजरात उच्च न्यायालयातील प्रकार

 

गांधीनगर : येथिल उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान गरूवार दि. १५ जून रोजी न्यायधिशांच्या समोर चार व्यक्तींनी फिनाईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

न्यायालयात फिनाईल प्राशन करून आत्महेत्येचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांनी कर्जासाठी बँकेशी संपर्क केला त्यावेळी त्यांचे कर्ज मंजूर झाले त्यावेळी बनावट कागदपत्रे बनवून त्यांचे नावावर कर्जाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांनी बँकेचे व्यवस्थापक व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला मात्र कर्ज परतफेडीसाठी बँकेकडून त्यांना त्रास होऊ लागला. सदरील आरोपीला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे पिढीतांनी न्यायालयात फिनाईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वाना पोलिसांनी तात्काळ दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणामुळे आवारातील न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विश्वासभंगाचा गुन्हा नोंद

बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज उचलून ते पैसे भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या बॅक व्यवस्थापक व सल्लागार यांचेविरोधात अहमदाबादमधील आनंदनगर पोलिस ठाण्यात फसवणूक व गुन्हेगारी व दाखल करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.