राज्यातील सर्व जागा लढवणार केसीआर

0 32

राज्यातील सर्व जागा लढवणार केसीआर

महाविकास आघाडीसोबत युतीस नकार

नागपूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत राज्यातील सर्व जागा बीआरएस पक्ष लढविणार असल्याची घोषणा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गुरूवार दि. १५ जून रोजी नागपूरात केली.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आज बीआरएसच्या नागपूर येथिल पक्ष कार्यालयाच्या उद्घटनाप्रसंगी बोलत होते. येणाऱ्या सर्व निवडणूका बीआरएस पक्ष स्वबळावर लढवणार असून महाविकास आघाडीसोबत युती करण्याची तयारी नसल्याचे सांगत त्यांनी राज्यातील सर्व जागावर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगत त्यांनी येणाऱ्या निवडणुकांध्ये इव्हीएम मशिन ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी केली.

पहीले पक्ष कार्यालय

बीआरएसच्या वतीने महाराष्ट्राच्या राजकारणात आरंभ करण्याचा प्रयत्न असल्याने त्यांनी राज्यातील पहील्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन नागपूर येथे केले.

धर्म गुरूनी मठ चालवावे

बीआरएसचे अध्यक्ष राव हे नागपुरातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी धर्म गुरुंनी मठ चालवायचे असतात मात्र भाजपने त्यांना संसदेत नेले अस म्हणत त्यांनी भाजपला फटकारले.

Leave A Reply

Your email address will not be published.