कर्नाटकात धर्मांतर विरोधी कायदा रद्द

0 72

कर्नाटकात धर्मांतर विरोधी कायदा रद्द

कर्नाटक मंत्रिमंडळाचा निर्णय

 

बंगळुरू : कर्नाटकात झालेल्या सत्ता बदलानंतर काँग्रेसने राज्यात भाजपने लागू केलेले कायर करण्याचा निर्णय घेतला असून त्यात धर्मांतर विरोधी कायद्यासह आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपकडून अनेक कायदे करण्यात आले होते त्यात धर्मांतर विरोधी कायदा राज्यात लागू केला होता मात्र काँग्रेसकडून आता तो रद्द करून कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्याशिवाय शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्याविषयी माहीती समाविष्ठ केली होती मात्र ही माहीती वगळण्याचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी घेतल्याची माहिती प्रसारमाध्यांना दिली.

संविधान वाचन बंधनकारक

शालेय अभ्यासक्रमातून हेडगेवार यांचा धडा वगळल्यानंतर महाविद्यालयामध्ये संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन बंधनकारक करण्यात आल्याची माहिती मंत्री एच.के पाटील यांनी दिली.

धर्मांतर विरोधी कायद्यातील तरतुदी

भाजपकडून राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यात आला होता, या कायद्यात एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्यास बंधने घालून त्यात २५ हजार रुपये दंड व दहा वर्ष शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.