बाळूमामा ट्रस्ट व सरपंच यांच्यात हाणामारी

0 513

बाळूमामा ट्रस्ट व सरपंच यांच्यात हाणामारी

 

Balumama Trust आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानचे संचालक आणि सरपंच यांच्यात कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात हाणामारीची घटना ३ एप्रिलला घडली. देवस्थान समितीचा कारभार आणि संचालक यांची नेमणूक यांच्यावरून ही हाणामारी झाली.

श्री. बाळूमामा देवालय ट्रस्ट’ची स्थापना वर्ष २००३ मध्ये करण्यात आली. यातील १८ संचालकांपैकी ६ संचालकांचे निधन झाले असून सध्या १२ संचालक कार्यरत आहेत. संचालक नेमणूक आणि मंदिरात चालू असलेल्या कारभाराच्या संदर्भात आदमापूर येथील सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. या संदर्भात ते अधिवक्त्यांना भेटण्यासाठी कोल्हापुरात आले असता त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि त्यांचे साथीदार यांच्यात जोरदार वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.