पानगावत उसळला भिमसागर – जय भिम़़़जय भिमच्या घोषाने परिसर गेला दणाणून

0 38

पानगावत उसळला भिमसागर
– जय भिम़़़जय भिमच्या घोषाने परिसर गेला दणाणून

लातूर : जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात असणाºया पानगाव येथे भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थाी असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधावर रोजी महापरिनिर्वाण दिनी या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता़ यावेळी जय भिम जय भिम च्या जयघोषाने हा परिसर दणाणून गेला़ रात्रीच्या १२ वाजल्यापासून अभिवादन करण्यासाठी भिम अनुयायांकडून मोठी गर्दी केली होती़ यावेळी ६ डिसेंबरच्या पहिल्या मिनिटाला पुष्पचक्र अर्पण करून अनुयायांनी पंचशील त्रिशरण ग्रहण केले़
महारिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर चौकात ध्वजावंदन करण्यात आले़ यावेळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पानगाव येथे अभिवादन करण्यासाठ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, माजी सनदी अधिकारी भा़ई़ नगराळे, रेणापुरचे तहसीलदार डॉ़ धम्मप्रिय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन करून अस्थींचे दर्शन घेतले़ यावेळी राजकीय, सामाजिक, शासकीय अधिकारी तसेच भिम अनुयायी मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी आले होते़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी दिवसभर गर्दी केली़ यात अनेक सामाजिक संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामिल झाले होते़ यावेळी इतर अनेक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन मदतकार्य केले़ यावेळी डॉ़ व्हीक़े़ आचार्य, नामदेव आचार्य, सुर्यभान आचार्य, दशरथ आचार्य, गौतम गोडबोले, नारायण आयार्च आणि इतर कार्यकर्त्यांन अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांना गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी स्वत: पुढकार घेतला़ अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या रांगा लावण्यासाठी हे अनुयायी प्रयत्न करत होते़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची विक्री
पानगाव येथे भिम अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी ल्हििलेले साहित्याची मोठ्या प्रमणात विक्री होते़ याठिकाणी मोठ्या संख्येने पुस्तकांची विक्री होते़ यात पुस्काच्या खरेदी विक्री बरोबर गाण्यांच्या कॅसेट उपलब्ध असल्याने त्याला प्रचंड मागणी आहे़
पोलिसांचा मोठा फौजफाटा
अभिवादन करण्यासाठी लातूससह महाराष्ट्र व बाहेर राज्यातून अनुयायाी अभिवादन करण्यासाठी पानगाव येथे येतात़ त्यांच्या अभिवादन करण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असते़ याठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त होता़

Leave A Reply

Your email address will not be published.