निंभोरेत शिवधर्म पद्धतीने केले अस्थिविसर्जन 

0 261

निंभोरेत शिवधर्म पद्धतीने केले अस्थिविसर्जन 

 

करमाळा : तालुक्यातील निंभोरे येथील विजय युवराज सांगळे यांचे दिनांक १० जुलै रोजी आकस्मित निधन झाले होते. स्मृतिशेष विजय सांगडे यांचे अस्थि विसर्जनाचा म्हणजे तिसरा दिवस जुन्या रूढी परंपरांना फाटा देत शिवधर्म पद्धतीने अस्थि विसर्जित करण्यात आल्या.

ज्या ठिकाणी स्मृतिशेष विजय सांगडे यांचे वर अंतिम संस्कार करण्यात आले होते. त्याच्या शेजारीच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या वृक्षांची लागवड कै. विजय सांगडे यांचे वडील, आई, सर्व बंधू, मुले, तसेच पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, माजी आमदार नारायण आबा पाटील, प्रदीप मामा जगदाळे, करमाळा तालुका मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे ,नामदेवराव वाघमारे, पोपटराव वाघमारे, विष्णू वाघमारे, विलास पाटील, बासूभाई मुलानी, हिम्मत सोलनकर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके,कैलास काकडे, रवी वळेकर, कांबळे सर,डॉक्टर अमोल माने, योगेश माने निंभोरे येथील पंडित वळेकर तसेच सांगडे परिवाराचे सर्व नातेवाईकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

विजय सांगडे यांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता वृक्षारोपण वेळी वृक्षारोपणासाठी घेतलेल्या खड्ड्यात विसर्जित करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सदर वेळी माजी आमदार नारायण आबा पाटील, सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, वाघोली चे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी श्रद्धांजलीपर विचार व्यक्त केले.विजय सांगडे यांचे उर्वरित विधी म्हणजे दहावा दहाव्या दिवशी न घेता पाचवे दिवशी घेण्याचा निर्णय सांगडे कुटुंबाने त्या ठिकाणी व्यक्त केला. करमाळा तालुक्यात खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचल्याचे समाधानही या ठिकाणी उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी अकलूज, वाघोली, शेवरे, टेम्भूर्णी, कंदर, जेऊर, तसेच निंभोरे येथील सांगडे परिवाराचे नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.